SA vs PAK 1st Test : पाकिस्तान की दक्षिण अफ्रिका! कोणाची बाजू भक्कम? दुसऱ्या दिवशी असा झाला खेळ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत पाकिस्तान दक्षिण अफ्रिका पहिला सामना खेळत आहेत. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्या डावात 378 धावा केल्या होत्या. त्याला आता दक्षिण अफ्रिकेने प्रत्युत्तर दिलं आहे. कसा झाला दुसऱ्या दिवसाचा खेळ जाणून घ्या.

SA vs PAK 1st Test : पाकिस्तान की दक्षिण अफ्रिका! कोणाची बाजू भक्कम? दुसऱ्या दिवशी असा झाला खेळ
SA vs PAK 1st Test : पाकिस्तान की दक्षिण अफ्रिका! कोणाची बाजू भक्कम? दुसऱ्या दिवशी असा झाला खेळ
Image Credit source: South Africa Cricket Twitter
| Updated on: Oct 13, 2025 | 9:08 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं चौथं पर्व सुरु झालं आहे. या पर्वात गतविजेता दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तानचा सामना होत आहे. दक्षिण अफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु असून पाकिस्तानने नाणेफेकीच कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 378 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दोन धक्के बसल्यानंतरही आश्वासक खेळी केली. कर्णधार एडन मार्करम 20 धावा करून बाद झाला. तर वियान मुल्डरही काही खास करू शकला नाही. अवघ्या 17 धावा करूनं तंबूत परतला. पण रियान रिकल्टन आणि टोनी डी झोर्जी यांनी चांगली खेळी केली. तिसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. संघाच्या 174 धावा असताना रायन रिकल्टन 71 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा डाव घसरला.

टोनी डी झोर्जी एका बाजूने लढत होता. तर दुसऱ्या बाजूने धडाधड विकेट पडत होत्या. ट्रिस्टन स्टब्स 8 धावा करून बाद झाला. तर डेवॉल्ड ब्रेव्हिसला खातंही खोलता आलं नाही. काइल व्हेरेन फक्त दोन धावा करून बाद झाला. त्यामुळे 200 धावांवर सहा गडी तंबूत अशी स्थिती होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकेने 6 गडी गमवून 216 धावा केल्या आहेत. अजूनही दक्षिण अफ्रिकेचा संघ 162 धावांनी पिछाडीवर आहे. टोनी डी झोर्जी नाबाद 81 धाावंवर तर सेनुरन मुथुसामी नाबाद 6 धावांवर खेळत आहे. पाकिस्तानकडून नोमान अलीने 4 गडी बाद केले. तर साजिद खान आणि सलमान आघाने प्रत्येक 1 गडी बाद केला. आता तिसऱ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेचे फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 गुणतालिकेत दोन्ही संघांना पहिल्या स्थानी विराजमान होण्याची संधी आहे. कारण या स्पर्धेतील दोन्ही संघांचा पहिला सामना आहे. दोन्ही संघापैकी जो कोणी संघ हा सामना जिंकेल. त्याची थेट वर्णी पहिल्या स्थानी लागणार आहे. कारण विजयी टक्केवारी 100 होणार आहे. यामुळे टीम इंडियाची घसरण तिसऱ्यावरून चौथ्या स्थानी होईल. पण हा सामना ड्रा झाला तर दोन्ही संघांना फटका बसेल. 33.33 टक्क्यांसह पाचव्या स्थानी संयुक्तरित्या बसावं लागेल. तर टीम इंडिया तिसऱ्या स्थानी कायम राहील.