Captaincy | तिसऱ्या वनडेसाठी अचानक कर्णधार बदलला, या खेळाडूकडे जबाबदारी

क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी एकाएकी टीमचा कॅप्टन बदलण्यात आला आहे. याबाबत समजताच क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली.

Captaincy | तिसऱ्या वनडेसाठी अचानक कर्णधार बदलला, या खेळाडूकडे जबाबदारी
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 5:35 PM

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला. रविंद्र जडेजा आणि केएल राहुल ही जोडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. मात्र त्यानंतर विशाखापट्टणममध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने जोरदार कमबॅक केलं. टीम इंडियाला स्वसतात गुंडाळून विजयासाठी मिळालेलं आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केल. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 10 विकेट्सने विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. आता सीरिजमधील तिसरा आणि सीरिज डिसायडर सामना हा 22 मार्चला चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

हा सामना जिंकून टीम इंडियाला ही सीरिज जिंकण्याची संधी आहे. तसेच टीम इंडियाचं वनडे रँकिंगमधील अव्वल स्थानही दावणीला लागलं आहे. अव्वल स्थान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला विजय मिळवणं आवश्यक आहे. यामुळे तिसरा सामना हा टीम इंडियासाठी करो या मरो असा आहे.

दरम्यान दुसऱ्या बाजूला मात्र तिसऱ्या सामन्यासाठी टीम मॅनेजमेंटने कर्णधार बदलला आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. टीम मॅनेजमेंटने असा निर्णय का घेतला, हे आपण जाणून घेऊयात. आयपीएलमध्ये कर्णधार असलेल्या खेळाडूकडे तिसऱ्या सामन्यात नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येत आहे. टेम्बा बावुमाच्या जागी एडम मार्करम याला साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन करण्यात आलं आहे. टेम्बा हा दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार आहे.मात्र त्याच्या मांसपेशीत त्रास जाणवत असल्याने तिसऱ्या मॅचमध्ये एडम मार्करमला कॅप्टन करण्यात आलंय.

दरम्यान या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून विंडिजला बॅटिंगसाठी बोलावलं. विंडिजने आफ्रिकेला 261 धावांचं विजयी आव्हान दिलं आहे. विंडिजने निर्धारित 48.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 260 धावा केल्या. विंडिजकडून ब्रँडन किंग याने सर्वाधिक 72 धावांची खेळी केली. जेसन होल्डर याने 36 धावांचं योगदान दिलं. निकोलस पूरन याने 39 रन्स केल्या. तिघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. तर 5 जणांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र या पाचही जणांना 20 पार धावा करता आल्या नाहीत.

आयपीएलमध्ये हैदराबादचा कॅप्टन

दरम्यान 31 मार्चपासून आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामासाठी सनरायजर्स हैदराबादने टीमची धुरा एडमकडे सोपवली आहे. हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन हा आऊट ऑफ फॉर्म असल्याने त्याला रिलीज करण्यात आलं. त्याच्या जागी मार्करमला संधी देण्यात आली.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.