Sachin Tendulkar Tweet : अरे हा युवी की…, बुमराहच्या विक्रमानंतर मास्टर ब्लास्टरचं ट्विट, जाणून घ्या सचिन नेमकं काय म्हणाला?

| Updated on: Jul 02, 2022 | 7:01 PM

Sachin Tendulkar Tweet : जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. ब्रॉडने नोबॉल स्वीकारला तर वाईडवर 5 धावा. अशा प्रकारे षटकात एकूण 35 धावा झाल्या. बुमराहच्या फलंदाजीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक खास गोष्ट लिहिली आहे. सचिननं काय लिहिलंय. ते जाणून घ्या...

Sachin Tendulkar Tweet : अरे हा युवी की..., बुमराहच्या विक्रमानंतर मास्टर ब्लास्टरचं ट्विट, जाणून घ्या सचिन नेमकं काय म्हणाला?
सचिन तेंडुलकर
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG) कसोटी सामन्यात भारताचे विक्रमांवर विक्रम सुरू आहे आणि खेळाडुंचंही कौतुक सुरू आहे. पंत आणि जडेजान (Ravindra Jadeja) शतक केल्यानंतर ता पुन्हा एका खेळाडूनं विक्रम केलाय. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) त्याच्या गोलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हे अगदी सर्वांना माहीत आहे. मात्र, आज (शनिवार) त्यानं इंग्लंडमध्ये आपल्या फलंदाजीनं इतिहास रचला. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्यानं तब्बल 35 धावा काढल्या आहेत. तुम्हालाही ऐकूण आश्चर्य वाटेल. मग पाहणाऱ्यांसाठी ही किती मोठी सुवर्णसंधी असू शकते, याचा विचार करा. 1877 पासून म्हणजेच 145 वर्षांच्या कसोटी इतिहासातील ब्रॉडचं सर्वात महागडे षटक आहे, असं क्रीडा विश्वातले जाणकार म्हणतायत. या सामन्यात ब्रॉडनं कारकिर्दीतील 550वी विकेटही घेतली. पण यासोबत त्यानं एक लाजिरवाणा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

ब्रॉडची गोलंदाजी भारतीय फलंदाजांना आवडते. यापूर्वी 2007 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात युवराज सिंगने सलग 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते. त्यानंतर टीम इंडियानेही विजेतेपद पटकावले. आता बुमराहच्या आक्रमक फलंदाजीनंतर टीम इंडियाला हा सामना जिंकण्याची आशा आहे. मालिकेत संघ सध्या 2-1 ने पुढे आहे. भारतानं पहिल्या डावात 416 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबेपर्यंत इंग्लंडने एका विकेटमध्ये 16 धावा केल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

मास्टर ब्लास्टर काय म्हणाला?

जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. ब्रॉडने नोबॉल स्वीकारला तर वाईडवर 5 धावा. अशा प्रकारे षटकात एकूण 35 धावा झाल्या. बुमराहच्या फलंदाजीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक खास गोष्ट लिहिली आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले, हा युवी की बुमराह? मला 2007 ची आठवण करून देते…सोनी स्पोर्ट्सवर बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की बुमराहची खेळी वर्षानुवर्षे लक्षात राहील.

सचिन तेंडुलकरचं ट्विट

कसोटीविषयी अधिक…

1877 मध्ये कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजानं सांगितले की, यापूर्वी एका ओव्हरमध्ये 8 चेंडूही टाकले जात होते. तरीही हा पराक्रम झाला नाही. अशाप्रकारे जसप्रीत बुमराहचा विक्रम खास आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना एकूण 2470 वा कसोटी सामना आहे. याआधी झालेल्या 2469 कसोटींमध्ये एका षटकात कधीही 28 पेक्षा जास्त धावा झाल्या नाहीत. 3 वेळा एका ओव्हरमध्ये 28 धावा झाल्या. वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, ऑस्ट्रेलियाचा जॉर्ज बेली आणि दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज यांनी ही कामगिरी केली.

जाणून घ्या विशेष…

इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड कसोटी आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. युवराज सिंगने 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये 6 षटकारांसह 36 धावा केल्या होत्या. बुमराहची ही फलंदाजी देखील खास आहे कारण कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच सामना आहे. कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व करणारा तो 36वा खेळाडू आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा कोरोनामुळे हा सामना खेळत नाहीये.