Jasprit Bumrah World Record : बुमराहकडून ब्रॉडची धुलाई! एका ओवरमध्ये 35 धावा, रचला विश्वविक्रम, पाहा व्हिडीओ

Jasprit Bumrah World Record : आज कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका षटकात 30 किंवा त्याहून अधिक धावा झाल्या. जसप्रीत बुमराहनं 84 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर 4 धावा काढल्या. दुसरा चेंडू वाईड होता आणि त्यावर 4 धावाही घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर बुमराहने पुन्हा षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला मात्र हा चेंडू नोबॉल होता. पुढच्या 3 चेंडूत बुमराहने ब्रॉडवर सलग 3 चौकार मारले.

Jasprit Bumrah World Record : बुमराहकडून ब्रॉडची धुलाई! एका ओवरमध्ये 35 धावा, रचला विश्वविक्रम, पाहा व्हिडीओ
आजच्या सामन्याकडे विशेष लक्षImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 8:33 PM

नवी दिल्ली :  जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) इंग्लंडच्या भूमीवर जोरदार कामगिरी दाखवत मोठा विक्रम केलाय. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघ 416 धावांत संपुष्टात आला (IND vs ENG) ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजानं (Ravindra Jadeja) शतक झळकावलं. त्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहनं 16 चेंडूत नाबाद 31 धावा करत धावसंख्या 400 धावांच्या पुढे नेली. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्यानं 35 धावा दिल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडं षटक ठरलं असून हा विश्वविक्रम झालाय. बुमराहनं 4 चौकार आणि 2 षटकार मारले. याआधी ब्रायन लारानं 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या आर पीटरसनविरुद्ध एका षटकात 28 धावा दिल्या होत्या. तर  2013 मध्ये जॉर्ज बेलीनेही जेम्स अँडरसनच्या षटकात 28 धावा केल्या होत्या. 2020 मध्ये केशव महाराजनं जो रूटच्या षटकात 28 धावा केल्या होत्या. दरम्यान, बुमराहनं या सर्वांचे विक्रम तोडत मोठी कामगिरी केली आहे. बुमराहचे फॅन्स देखील खूश झाले आहेत. सध्या बुमराहची जोरदार चर्चा आहे.

बुमराहचा व्हिडीओ पाहा

इतिहासात पहिल्यांदाच….

आज कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एका षटकात 30 किंवा त्याहून अधिक धावा झाल्या. जसप्रीत बुमराहनं 84 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर 4 धावा काढल्या. दुसरा चेंडू वाईड होता आणि त्यावर 4 धावाही घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर बुमराहने पुन्हा षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला मात्र हा चेंडू नोबॉल होता. पुढच्या 3 चेंडूत बुमराहने ब्रॉडवर सलग 3 चौकार मारले. त्याने पाचव्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर धाव घेतली. अशा प्रकारे षटकात एकूण 35 धावा झाल्या. ब्रॉडने ओव्हरमध्ये एकूण 8 चेंडू टाकले. बुमराह प्रथमच संघाचे नेतृत्व करत आहे.

बुमराहचा व्हिडीओ पाहा

जसप्रीत बुमराह 31 धावांवर नाबाद राहिला. त्याची कसोटी कारकिर्दीतील ही दुसरी मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी त्याने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध नाबाद 34 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली होती. तो त्याच्या कारकिर्दीतील 30वी कसोटी खेळत आहे आणि त्याने केवळ 2 वेळा 30 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याआधी 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार मारले होते.

हायलाईट्स

  1. रवींद्र जडेजानं इंग्लंडमध्ये पहिल्यांदा शतक झळकावलंय
  2. रवींद्र जडेजाचं कसोटी कारकिर्दीतील हे तिसरं आणि वर्षातील दुसरं शतक आहे
  3. 31 चेंडूत 16 धावा करून शमीला स्टुअर्ट ब्रॉडनं बाद केलं
  4. ब्रॉडचा हा कसोटी कारकिर्दीतील 550 वा विकेट आहे
  5. 33 वर्षीय रवींद्र जडेजाचे देशाबाहेर हे पहिलेचं कसोटी शतक आहे.
  6. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात त्यानं 35 धावा दिल्या
  7.  कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात महागडं षटक ठरलंय
Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.