AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravindra Jadeja Century : रवींद्र जडेजानं ठोकलं वर्षातील दुसरं शतक, इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, जाणून घ्या…

Ravindra Jadeja Century : रवींद्र जडेजानं वर्षातील दुसरं शतक ठोकलं आहे, इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच त्यानं एक पराक्रम केला आहे. इंग्लंड विरुद्ध भारताचा कसोटी सुरू असताना जडेजानं केलेली कामगिरी कौतुकास्पद असून त्याच्या फॅन्सकडून देखील सोशल मीडियावर कौतुक केलं जातंय. जाणून घ्या जडेजानं सामन्यात केलेल्या कामगिरीविषयी...

Ravindra Jadeja Century : रवींद्र जडेजानं ठोकलं वर्षातील दुसरं शतक, इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, जाणून घ्या...
रवींद्र जडेजाचं शतकImage Credit source: icc
| Updated on: Jul 02, 2022 | 8:33 PM
Share

नवी दिल्ली :  रवींद्र जडेजानं (Ravindra Jadeja) इंग्लंडमध्ये पहिल्यांदा शतक (Century) झळकावलंय. त्याचं कसोटी कारकिर्दीतील हे तिसरं आणि वर्षातील दुसरं शतक आहे. त्यानं हा पराक्रम इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत (IND vs ENG) 183 चेंडूत केला. 98 धावांत 5 विकेट गमावल्यानंतर भारतीय संघानं आम्ही ही बातमी लिहत असताना 82 षटकांत 9 गडी गमावून 375 धावा केल्या होत्या. जडेजा 104 धावा करून जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. जसप्रीत बुमराह 0 धावा करून खेळत आहे. याआधी ऋषभ पंतनेही 146 धावा केल्या होत्या. टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. आता 2 शतकांच्या जोरावर या सामन्यातही संघाने आगेकूच केली आहे.

आयसीसीचं ट्विट

सामन्यात काय झालं?

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी भारतीय संघानं 7 बाद 338 धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीनं धावसंख्या 371 पर्यंत नेली. दोघांनी 48 दिल्या. 31 चेंडूत 16 धावा करून शमीला स्टुअर्ट ब्रॉडनं बाद केलं. ब्रॉडचा हा कसोटी कारकिर्दीतील 550 वा विकेट आहे. दरम्यान, जडेजानं 13 चौकारांच्या मदतीनं आपले शतक पूर्ण केले. याआधी मार्चमध्ये त्यानं मोहालीत श्रीलंकेविरुद्ध नाबाद 175 धावांची खेळी केली होती. 194 चेंडूत 104 धावा करून तो बाद झाला.

आयसीसीचं ट्विट

देशाबाहेर पहिले शतक

33 वर्षीय रवींद्र जडेजाचे देशाबाहेर हे पहिलेचं कसोटी शतक आहे. यापूर्वी त्यानं घरच्या मैदानावर दोन्ही शतकं झळकावली होती. या सामन्यापूर्वी एजबॅस्टन येथे भारताकडून फक्त सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी शतक झळकावले होते. पण पंत आणि जडेजा या दोघांनीही या सामन्यात शतके झळकावून इतिहास रचला आहे. पंतने 89 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

भारतीय डावाबद्दल बोलायचे झालं तर रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांच्याशिवाय इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला 30 धावांचा टप्पा गाठता आला नाही. हुनमा विहारीनं 20 आणि शुभमन गिलने 17 धावा केल्या. विराट कोहली 11 आणि चेतेश्वर पुजारा 13 धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरनं 15 धावांचे योगदान दिलं.

हायलाईट्स

  1. रवींद्र जडेजानं इंग्लंडमध्ये पहिल्यांदा शतक झळकावलंय
  2. रवींद्र जडेजाचं कसोटी कारकिर्दीतील हे तिसरं आणि वर्षातील दुसरं शतक आहे
  3. 31 चेंडूत 16 धावा करून शमीला स्टुअर्ट ब्रॉडनं बाद केलं
  4. ब्रॉडचा हा कसोटी कारकिर्दीतील 550 वा विकेट आहे
  5. 33 वर्षीय रवींद्र जडेजाचे देशाबाहेर हे पहिलेचं कसोटी शतक आहे.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.