AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HBD Salil Ankola: तेंडुलकरसोबत डेब्यू, बोन ट्युमरमुळे क्रिकेट सोडलं, मग रुपेरी पडद्यावर नाव कमावलं

सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले तो दिवस सर्वांच्या लक्षात असेल. 15 नोव्हेंबर 1989 ही तारीख होती जेव्हा सचिनने पाकिस्तानविरुद्ध कराचीमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात मुंबईच्या आणखी एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते पण त्याला सचिनसारखी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे त्याला सचिनसारखी प्रसिद्धी मिळाली नाही.

HBD Salil Ankola: तेंडुलकरसोबत डेब्यू, बोन ट्युमरमुळे क्रिकेट सोडलं, मग रुपेरी पडद्यावर नाव कमावलं
पाकिस्तानच्या या दौऱ्यावर सलीलने 18 डिसेंबर 1989 रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेImage Credit source: TV9 Marathi
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Mar 01, 2022 | 8:54 AM
Share

मुंबई : सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले तो दिवस सर्वांच्या लक्षात असेल. 15 नोव्हेंबर 1989 ही तारीख होती जेव्हा सचिनने पाकिस्तानविरुद्ध कराचीमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात मुंबईच्या आणखी एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते पण त्याला सचिनसारखी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे त्याला सचिनसारखी प्रसिद्धी मिळाली नाही. सलील अंकोला (Salil Ankola) असे या खेळाडूचे नाव आहे. सलीलने क्रिकेटमध्ये सक्रीय असताना जितकं नाव कमावलं, त्यापेक्षा मोठं नाव त्याने क्रिकेट सोडल्यानंतर अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीद्वारे (Acting Career) कमावलं. सलीलने सचिनसोबत पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. ही त्याची पहिली आणि शेवटची कसोटी ठरली. त्यानंतर तो भारताकडून कसोटी खेळला नाही. या सामन्याच्या पहिल्या डावात सलीलने 19 षटकात 93 धावांत एक विकेट घेतली. दुसऱ्या डावात त्याने 11 षटकात 35 धावा देत एक बळी घेतला.

पाकिस्तानच्या या दौऱ्यावर सलीलने 18 डिसेंबर 1989 रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पावसामुळे हा सामना 16-16 षटकांचा झाला आणि सलीलने चार षटकांत 26 धावा देत दोन गडी बाद केले. पुढील काही सामन्यांमधील खराब कामगिरीनंतर त्याला संघातून वगळण्यात आले, पण 1993 मध्ये त्याने पुनरागमन केलं. यावेळीदेखील तो छाप पाडू शकला नाही. यावेळी त्याच्या खराब क्षेत्ररक्षणावर बरीच टीका झाली.

1996 च्या विश्वचषकात पुनरागमन

सलीलने हार न मानता पुन्हा एकदा संघात पुनरागमन केले. यावेळी त्याची 1996 च्या विश्वचषकासाठी संघात निवड झाली. या विश्वचषकात तो एकच सामना खेळला. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी मिळाली. अपयशी ठरल्याने त्याला पुन्हा संघातून वगळलं.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी

सलीलने शेवटचा एकदिवसीय सामना 13 फेब्रुवारी 1997 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्याने भारतासाठी 20 एकदिवसीय सामने खेळले आणि त्यात 13 बळी घेतले ज्यात 33 धावा देऊन 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याच वेळी, सलीलने 54 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 181 बळी घेतले. लिस्ट-ए मध्ये त्याने 75 सामन्यांमध्ये 70 विकेट घेतल्या आहेत.

बोन ट्यूमरने क्रिकेट करिअर संपवलं

नंतर एका आजाराने त्याची कारकीर्द संपवली. बोन ट्यूमरने त्याचं क्रिकेट करिअर संपवलं. देशांतर्गत सामन्यात गोलंदाजी करताना त्याला त्रास झाला आणि तो पडला, पण नंतर कळले की त्याला बोन ट्यूमर आहे, ज्यामुळे त्याला पुन्हा क्रिकेट खेळता आलं नाही.

बोन ट्यूमरवरील शस्त्रक्रिया फसली

31 डिसेंबर 2020 रोजी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सलीलने सांगितलं की, त्याच्यावर झालेली शस्त्रक्रिया फसली होती. मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीच्या सर्वात योग्य टप्प्यात होतो. पण ते एक धोकादायक ऑपरेशन होते जे नीट झाले नाही. मी लोकांचे ऐकायला हवे होते आणि शस्त्रक्रियेसाठी परदेशात जायला हवे होते. माझ्यामध्ये सहा-सात वर्षांचं क्रिकेट बाकी होतं. पण शस्त्रक्रिया नीट न झाल्याने माझं मोठं नुकसान झालं.

छोट्या पडद्यावरील यशस्वी कारकीर्द

यानंतर सलीलने अभिनय विश्वात पाऊल ठेवले आणि छोट्या पडद्यावर प्रवेश केला. झी टीव्हीवर ‘चाहत और नफरत’ ही त्याची पहिली मालिका होती. याशिवाय ‘वो सच है’, ‘जाल’, ‘सीआयडी’, ‘श्श्श्श… कोई है’, ‘करम अपना अपना’, ‘विक्राल और गब्राल’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केले.

बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळालं नाही

त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. पण तिथे त्याला फारसे यश मिळाले नाही. त्याने संजय दत्तच्या ‘कुरुक्षेत्र’, ‘चुरा लिया तुमने’, ‘पिता’, ‘तेरा इंतजार’ या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या.

क्रिकेटमध्ये पुनरागमन

सलील गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये क्रिकेटमध्ये परतला. त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचा प्रमुख बनवण्यात आले आहे.

इतर बातम्या

IND vs SL: ‘गवताला पाणी मिळाल नाही की…’ चहलने आपल्याच मित्राला कॅमेऱ्यासमोर केलं ट्रोल, पहा VIDEO

Mohammed Shami on Trolling: ‘ते खरे भारतीय नाहीत’, धर्मावरुन ट्रोलिंग करणाऱ्यांना मोहम्मद शमीचं सडेतोड उत्तर

IND vs SL: T 20 मध्ये रोहित शर्माला ‘या’ श्रीलंकन गोलंदाजाने बनवलय खेळणं, हवं तेव्हा करतो आऊट

Follow Us
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी.....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....