
Salman Khan Viral Video: समाज माध्यमांवर सलमान खान याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो ISPL या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने मैदानावर पण हजेरी लावली. या कार्यक्रमात एक रोबोटही होता. या रोबोटला पाहुन सलमान खान आनंदीत होतो. बॉलिवूडच्या सुपरस्टारला त्याच्याशी हस्तांदोलन करण्याचा मोह होतो. भाईजान रोबोटकडे हात पुढे करतो. पण रोबोट त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. तो जणू सलमान खान याला ॲटिट्यूड दाखवतो. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओवर सलमानचे चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सलमान खानशी का केले नाही हस्तांदोलन?
व्हायरल व्हिडिओत हे स्पष्ट दिसत आहे की, सलमान खान हा रोबोटकडे हस्तांदोलनासाठी हात पुढे करतो. पण तो कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. रोबोट हात पुढे करत नाही. मग तितक्यात पाठीमागून एक व्यक्ती येते आणि ती रोबोटचा सेन्सर तापसते. त्यानंतर रोबोट सक्रिय होतो. तो भाईजानशी हस्तांदोलन करतो. हात मिळवतो. त्यावर सलमान खान याला हसू आवरत नाही. सलमान खळखळून हस्ताच, त्याची मनमुराद दाद मिळताच आजूबाजूचे लोकही हसतात.
युझर्सच्या या व्हिडिओवर धमाकेदार कमेंट
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. युझर्सने सलमान खान आणि रोबोटच्या या व्हायरल व्हिडिओवर धमाकेदार कमेट केल्या आहेत. एका युझर्सने स्पष्ट केले आहे की, रोबोट तर भाईजानवर नाराज झाला आहे. तर दुसर्या एका युझरने आता कुणीतरी भाईजानला टशन दाखवली अशी कमेंट केली आहे. एकाने मजेशीर कमेंट केली. भाई, अगोदर रोबोटच्या सेन्सरकडे जायचे असते अशी ती कमेंट आहे. तर एकाने आता रोबोट पण ॲटिट्यूड दाखवत असल्याचे तो म्हणतोय.
बॅटल ऑफ गलवान
सलमान खान याचा बॅटल ऑफ गलवान हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर हा चित्रपट आधारीत असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट येत्या 17 एपिल 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात भाईजान सलमान खान याच्यासोबत चित्रांगदा सिंह पण आहे. हा चित्रपट अपूर्व लाखिया याने दिग्दर्शित केला आहे. दरम्यान आयएसपीएल या कार्यक्रमात चाहत्यांनी सलमानचा ऑटोग्राफही घेतला. यावेळी सलमान खान हा प्रेक्षकांशी हास्यविनोद करताना दिसला. यावेळी काही क्रिकेट खेळाडू सुद्धा मैदानात हजर होते.