
दिल्ली कॅपिट्ल्सने मंगळवारी 22 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सचा त्यांच्या घरच्याच मैदानात धुव्वा उडवला. दिल्लीने यासह आयपीएल 2025 मधील सहावा विजय मिळवला. केएल राहुल हा दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. केएलने आपल्या माजी संघाविरुद्ध नाबाद विजयी खेळी केली. केएलने या विजयानंतर त्याच्या माजी संघाचे मालक संजीव गोयंका यांच्याकडे ऑन कॅमेरा दुर्लक्ष केलं. केएलने लखनौविरुद्ध केलेल्या खेळीमुळे दिल्लीने लखनौवर एकाना स्टेडियममध्ये 8 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. त्यामुळे आता सोशल मीडियावर या सर्व प्रकाराची चर्चा रंगली आहे. तसेच केएल आणि गोयंका या दोघांचा व्हीडिओही व्हायरल झाला आहे.
दिल्लीच्या विजयानंतर दोन्ही संघांचे खेळाडू परंपरेप्रमाणे हस्तांदोलनासाठी मैदानात आले. संजीव गोयंका हस्तांदोलन झाल्यानंतर केएल राहुलचे अभिनंदन करण्यासाठी गेले. केएलनेही गोयंका यांच्यासह हस्तांदोलन केलं. त्यानंतर गोयंका यांनी केएलसह संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र केएलने गोयंका यांना दाद दिली नाही. केएलने गोयंका यांच्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष केलं आणि पद्धतशीर निघून गेला.
गोयंका यांनी केएलसह काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. पण केएलने आपला वेळ वाया घालवला नाही. त्यानंतर केएल दिल्ली कॅपिटल्सच्या डगआउटच्या दिशेने निघून गेला. त्यामुळे संजीव गोयंका यांचा चेहरा पडला.
केएल राहुल हा 2022 ते 2024 दरम्यान लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. मात्र गेल्या हंगामात सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर संजीव गोयंका यांनी केएल राहुलला भर मैदानात झापलं होतं. त्यानंतर केएल आणि गोयंका यांच्यामध्ये कटुता निर्माण झाली. इतकंच काय तर लखनौने केएलला करारमुक्तही केलं होतं. केएलच्या डोक्यात तेव्हापासून ही चिड होती. मात्र केएलने अखेर लखनौविरुद्धच्या सामन्यानंतर अचूक परतफेड केली.
केएल राहुलकडून अचूक परतफेड!
KL Rahul did absolutely right to not give any respect whatsoever to Sanjiv Goenka and his son. The two deserves no respect from cricketing world.
Absolute Cinema.
— Chetan Sehrawat (@sehrawatc463) April 22, 2025
दरम्यान दिल्लीने लखनौकडून मिळालेलं 160 धावांचं आव्हान हे 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. केएलने दिल्लीच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. केएलने 42 बॉलमध्ये 3 फोर आणि 3 सिक्ससह 57 रन्स केल्या. तर कर्णधार अक्षर पटेल याने 20 चेंडूत 34 धावांची नाबाद खेळी केली. तर त्याआधी अभिषेक पोरेल याने 51 आणि करुन नायर याने 15 धावांचं योगदान दिलं. दिल्लीचा हा या मोसमातील सहावा विजय ठरला. दिल्लीने या विजयासह पॉइंट्स टेबलमधील आपलं दुसरं स्थान आणखी भक्कम केलं.