सरफराज खान की…! साई सुदर्शनच्या जागी कोणाची निवड होणार? 21 वर्षीय फलंदाजही शर्यतीत

डावखुरा फलंदाज साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकला आहे. दुखापतीतून सावरला नसल्याने या स्पर्धेतून आऊट झाला आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी संघात कोणाला संधी मिळणार? याची उत्सुकता आहे. या जागेसाठी दोन फलंदाजांमध्ये चुरस आहे.

सरफराज खान की...! साई सुदर्शनच्या जागी कोणाची निवड होणार? 21 वर्षीय फलंदाजही शर्यतीत
सरफराज खान की...! साई सुदर्शनच्या जागी कोणाची निवड होणार? 21 वर्षीय फलंदाजही शर्यतीत
Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 08, 2026 | 5:34 PM

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ बांधणी करणं डोकेदुखी ठरलं आहे. एका पाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. त्यामुळे भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. मालिकेपूर्वी भारतीय संघाला एका पाठोपाठ एक असे दोन धक्के बसले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेला मुकला होता. त्यानंतर खेळेल की नाही या चर्चा असताना साई सुदर्शनही या स्पर्धेतून आऊट झाला आहे. साई सुदर्शन दुखापतग्रस्त असल्याने दोन्ही कसोटी सामन्यांना मुकला आहे. प्लेइंग 11 मध्ये त्याच्या तीन नंबर जागेवर देवदत्त पडिक्कलने दावा ठोकला आहे. सराव सामन्यात त्याने शतक ठोकून आपला दावा पक्का केला आहे. पण संघात साई सुदर्शनच्या जागेवर एक खेळाडू निवडणं भाग आहे. यासाठी दोन नावं चर्चेत आहेत. एक सरफराज खान आणि दुसरं नाव आहे 21 वर्षी शेख रशीदचं…

सरफराज खान की शेख रशीद?

मुंबईकर फलंदाज सरफराज खान आणि आंध्र प्रदेशचा युवा फलंदाज शेख रशीद हे दोघंही टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी शर्यतीत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शेख रशीद आणि सरफराज खान यांच्यात संघात जागा मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच आहे. सरफराज खान सध्या बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये आहे. तर राशीद खानला 9 ऑगस्टला येथे येण्यास सांगितलं आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाच निवड टीम इंडियासाठी होऊ शकते. आता बीसीसीआय या दोघांपैकी कोणाची निवड करणार? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

सरफराज खानने टीम इंडियासाठी डेब्यू केलं आहे. त्याने सहा कसोटी सामन्यात 371 धावा गेल्या आहेत. पण मागच्या दीड वर्षापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्याला कसोटी संघात काही स्थान मिळताना दिसत नाही. त्यामुळे निवड समितीवर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो. दुसरीकडे, शेख रशीद हा देखील फॉर्मात असून त्याचं नावही आघाडीवर आहे. त्याने 29 फर्स्ट क्लास सामन्यात 47 च्या सरासरीने 1959 धावा केल्या आहेत. मागच्या महिन्यात इंडिया ए संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. तेव्हा त्याने 3 डावात 63, 20 आणि 45 धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याचा विचार होणं सहाजिकच आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us