Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियात युवराजसिंह याची निवड, क्रिकेट चाहत्यांमध्ये जल्लोष
YuvrajSinh | बीसीसीआयने आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. निवड समितीने युवराजसिंह याला संधी दिली आहे.

मुंबई | क्रिकेट वूमन्स टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात 9 जुलैपासून होणार आहे. तर मेन्स टीम इंडियाचा विंडिज दौऱ्याला 12 जुलैपासून श्रीगणेशा होणार आहे. मेन्स टीम इंडिया विंडिज दौऱ्यानंतर आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर बहुप्रतिक्षित आशिया कप 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या दरम्यान बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. टीम इंडियाकडून आशिया कप स्पर्धेत युवराजसिंह खेळणार आहे. युवराजला संधी मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. क्रिकेट रसिकांमध्ये युवराजला मैदानात पाहण्यासाठी उत्सूकता शिगेला पोहचली आहे.
बीसीसीआयने मंगळवारी 4 जुलै रोजी एमर्जिंग एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय टीम इंडिया ए संघ जाहीर केला.सोबतच राखीव म्हणून 4 खेळाडूंचा समावेशही केला आहे. या स्पर्धेसाठी युवराजसिंह यांची निवड करण्यात आली आहे. टीम इंडिया ए संघाचं युवा यश धुल हा नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेसाठी अनेक युवा खेळाडू्ंना संधी देण्यात आली आहे. यापैकी सोराष्ट्रकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या 22 वर्षीय युवराजसिंह दोडिया याची निवड करण्यात आली.
युवराजसिंह दोडिया याची क्रिकेट कारकीर्द
युवराजसिंहने 27 डिसेंबर 2022 रोजी मुंबई विरुद्ध फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. युवराजसिंह याने आतापर्यंत सौराष्ट्रकडून एकूण 6 फर्स्ट क्लास सामने खेळला आहे. युवराजसिंहने या 6 सामन्यांमधील 12 डावात 30 विकेट्स घेतल्या आहेत. युवराजसिंहने 1 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. युवराजची 91 धावा देऊन 5 विकेट्स ही एका डावातील, तर 129 रन्सच्या मोबदल्यात 8 विकेट्स ही एका सामन्यातील सर्वोच्च कामगिरी आहे.
आशिया कप स्पर्धेतील टीम इंडिया ए चं वेळापत्रक
1) 13 जुलै, टीम इंडिया ए विरुद्ध यूएई ए.
2) 15 जुलै, टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए.
3) 18 जुलै, टीम इंडिया ए विरुद्ध नेपाळ ए.
4) 21 जुलै, दोन्ही सेमी फायनल.
5) 23 जुलै, फायनल.
टीम इंडिया ए
यश धुल (कर्णधार), अभिषेक शर्मा (उपकर्णधार), साई सुदर्शन, निकिन जोस, प्रदोष रंजन पॉल, रियान पराग, निशांत सिंधू, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, युवराजसिंह डोडिया, हर्षित राणा, आकाश सिंग, नितीशकुमार रेड्डी आणि राजवर्धन हंगरगेकर.
राखीव खेळाडू | हर्ष दुबे, नेहल वढेरा, स्नेल पटेल आणि मोहित रेडकर.
