SCO vs AUS: ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, पावर प्लेमध्ये 113 धावा, हेडने झोडला
Scotland vs Australia 1st T20i : ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श या जोडीने स्कॉटलँड विरुद्ध वादळी खेळी करत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँड विरूद्धच्या पहिल्या टी20i सामन्यात 155 धावांचा पाठलाग करताना वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ऑस्ट्रेलियाने शून्य धावसंख्येवर पहिली विकेट गमावली. जॅक फ्रेजर-मॅकगर्क पदार्पणातील सामन्यात झिरोवर आऊट झाला. मात्र त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि कॅप्टन मिचेल मार्श या जोडीने धमाका केला. या जोडीने पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 113 धावा ठोकल्या. ऑस्ट्रेलियाने यासह टी 20i पावर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्व विक्रम आपल्या नावावर केला. विशेष बाब म्हणजे हेड आणि मार्श या जोडीने पाचव्या आणि सहाव्या ओव्हरमध्ये फक्त चौकार आणि षटकारच ठोकले. ट्रॅव्हिस हेडने या दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून वेगवान अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला. हेडने अवघ्या 17 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं.
14 बॉल आणि 66 धावा
मिचेल मार्शने पाचव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर सिक्स ठोकला. मार्शने या ओव्हरमध्ये धमाका केला. मार्शने दुसऱ्या बॉलवर सिक्स खेचला. तिसऱ्या बॉलवर चौकार लगावला. त्यांतर मार्शने चौथ्या चेंडूवर षटकार फटकावला. मार्शने पाचव्या आणि सहाव्या बॉलवर फोर ठोकले आणि एका ओव्हरमध्ये 30 धावा केल्या. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने सहाव्या ओव्हरमध्ये झंझावाती खेळी केली. हेडने सहाव्या ओव्हरमध्ये अनुक्रमे 6,6,4,6,4,4 अशी फटकेबाजी करुन 26 धावा केल्या. अशाप्रकारे मार्श आणि हेड या दोघांनी 2 ओव्हरमध्ये 56 धावा केल्या. हेडने त्याआधी चौथ्या ओव्हरमधील शेवटच्या 2 चेंडूवर सिक्स आणि फोर ठोकून 10 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 14 बॉलमध्ये 66 धावा केल्या.
दरम्यान ऑस्ट्रेलियाने हेड आणि मार्श या जोडीने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर 155 धावांचं आव्हान हे 9.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. हेडने 25 बॉलमध्ये 80 रन्स केल्या. तर मार्शने 12 चेंडूत 39 धावांचं योगदान दिलं. जोस इंग्लिसने 13 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. तर स्टोयनिसने नाबाद 8 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाची पावर प्लेमध्ये वादळी खेळी
AUSTRALIA – 113 FOR 1 FROM 6 OVERS. 🥶
HIGHEST SCORE EVER IN POWERPLAY IN T20I HISTORY….!!!! pic.twitter.com/QBsQ6D0atY
— Johns. (@CricCrazyJohns) September 4, 2024
स्कॉटलँड प्लेइंग ईलेव्हन : रिची बेरिंगटन (कर्णधार), जॉर्ज मुन्से, ओली हेयर्स, ब्रँडन मॅकमुलेन, मॅथ्यू क्रॉस, मायकल लीस्क, मार्क वॉट, जॅक जार्विस, चार्ली कॅसेल, जॅस्पर डेविडसन आणि ब्रॅड व्हील.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, जॅक फ्रेजर-मॅकगर्क, जोश इंग्लिस, मार्कस स्टोयनिस, टीम डेव्हिड, कॅमरून ग्रीन, सीन एबॉट, झेवियर बार्टलेट, एडम झॅम्पा आणि रिले मेरेडिथ.