
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला असून 1-0 ने आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी या सामन्यात जबरदस्त खेळी केली. असं असताना दुसरीकडे वेगळ्याच वादाला फोडणी मिळाली आहे. रोहित शर्मा-विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद असल्याची चर्चा रंगली आहे. गौतम गंभीरसोबत त्यांचं बोलणंच होत नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम ड्रेसिंग रूममध्ये होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे ही स्थिती सुधारण्यासाठी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. एक दिग्गज खेळाडूला संघात गोटात धाडलं आहे. मिडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयने निवडकर्ते प्रज्ञान ओझाला संघासोबत पाठवलं आहे. त्यासाठी रांचीला पाठवलं होतं आणि आता संघासोबत रायपूरला पोहोचला आहे.
भारत दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये होणार आहे. अशा स्थितीत या सामन्यापूर्वी वाद शमवण्याची जबाबदारी प्रज्ञान ओझावर टाकली आहे. रायपूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी रांची एअरपोर्टवरील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्रज्ञान ओझा आणि विराट कोहली गंभीर चर्चा करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. दोघं बोलत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांच्यात चर्चा झाली नव्हती. आता कोहली आणि गंभीर दरम्यानही असंच असल्याचं बोललं जात आहे.
Some serious discussion between Virat Kohli and selector pragyan Ojha. https://t.co/fS88MRytDG pic.twitter.com/UrNcMWpfx5
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) December 2, 2025
दीड वर्षांनी म्हणजेच 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत आहेत. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्याच्या निर्णयाबाबत चर्चांचा बाजार गरम झाला आहे. रोहित आणि कोहलीच्या भविष्याबाबत सध्या बैठक होताना दिसत नाही. ही बैठक रायपूर वनडे दरम्यान होण्याची अपेक्षा होती . पण आता ही बैठक विशाखापट्टणममधील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यानंतर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गौतम गंभीरची टीम फर्स्ट रणनिती आणि सुपरस्टार कल्चर संपवण्याची निती कोहली-रोहितसारख्या दिग्गज खेळाडूंना खटकत असल्याची बोललं जात आहे.