AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका सामन्यात घेतल्या 11 विकेट..! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु असून निर्णायक टप्प्यावर आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजाने कहर केल आणि एकूण 11 विकेट घेतल्या.

एका सामन्यात घेतल्या 11 विकेट..! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी
एका सामन्यात घेतल्या 11 विकेट..! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरीImage Credit source: PTI
| Updated on: Oct 14, 2025 | 10:14 PM
Share

दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. तीन दिवसांचा खेळ संपला असून दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 226 धावांची गरज आहे. तर पाकिस्तानला 8 विकेट काढायच्या आहेत. दोन दिवसांचा खेळ शिल्लक असल्याने या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात 378 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिकेचा डाव 269 धावांवर आटोपला. पाकिस्तानकडे 109 धावांची आघाडी होती. या धावांसह पुढे खेळताना पाकिस्तानने दुसर्‍या डावात फक्त 167 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 276 धावांचं आव्हान दिलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकेने 2 गडी गमवून 51 धावा केल्या आहे.  आता चौथा दिवशीचा खेळ खूपच महत्त्वाचा असणार आहे. खऱ्या अर्थाने दक्षिण अफ्रिकन गोलंदाजाची कसोटी लागणार आहे. पण या तीन दिवसात 32 विकेट पडल्या. त्यापैकी 11 विकेट एकट्या दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजाने घेतल्या आहेत.

दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ मैदानात फलंदाजीसाठी आला तेव्हा धडाधड विकेट पडत गेल्या. या डावात एकाही फलंदाजाला 50 धावा करता आल्या नाहीत. यांचं कारण होता तो फिरकीपटू सेनुरन मुथुसामी.. फिरकीपटू मुथुसामीने पाकिस्तानच्या फलंदाजांचा सळो की पळो करून सोडलं. आपल्या फिरकीच्या तालावर त्याने त्यांना नाचवलं आहे. पहिल्या डावातही त्याने पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं होतं आणि आता दुसऱ्या डावातही कमाल केली. त्याच्या फिरकीमुळे पाकिस्तानचा दुसरा डाव फक्त 167 धावांवर आटोपला.

सेनुरन मुथुसामीने पहिल्या डावात 6 विकेट काढल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात 17 षटकं टाकली आणि 57 धावा देत 5 गडी बाद केले. यावेळी त्याने अब्दुल्ला शफीक, सउद शकील, सलमान आघा, शाहीन शाह आफ्रिदी आणि नोमान अलीला चालतं केलं. यासह मुथुसामीने या सामन्यात एकूण 11 विकेट घेतल्या. त्याने कसोटी कारकि‍र्दीत पहिल्यांदाच एकाच कसोटीत 10हून अधिक विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. अशी कामगिरी करणारा दक्षिण अफ्रिकेचा चौथा फिरकीपटू आहे. यापूर्वी 2018 मध्ये केशव महाराजने असं केलं होतं. यापूर्वी ह्यूग टेफील्ड आणि पॉल एडम्सने असं केलं होतं.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश