
मुंबई: आशिया कप (Asia Cup) स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या (IND vs PAK) महामुकाबल्याची तारीख निश्चित झाली आहे. 27 ऑगस्टपासून स्पर्धा सुरु होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर परंपरागत प्रतिस्पर्धी 28 ऑगस्टला आमने-सामने येतील. आशिया कप स्पर्धा दुबई UAE मध्ये होणार आहे. यूएई मध्ये पाकिस्तानने नेहमीच चांगली कामगिरी केलीय. त्यांच्या वक्तव्यामधूनही हे दिसून येतय. पाकिस्तानच्या त्या वक्तव्यांना शब्दाने नाही, तर बॅटने टीम इंडिया उत्तर देईल. 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान मध्ये होणाऱ्या लढतीआधी पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खानने एक वक्तव्य केलं आहे. त्याच हे वक्तव्य चर्चेत आहे. सामन्याआधी त्याने पाकिस्तानच्या विजयाची भविष्यवाणी केलीय. टीम इंडिया याला मैदानावरच उत्तर देईल.
“सामना मोठा आहे. मी आणि पाकिस्तानी खेळाडू विजयाच्या उद्देशाने मैदानावर उतरु. आमचा प्रयत्न विजयाचा असेल” असं शादाब खानने म्हटलय.
शादाब खान हे इतकं सहजपणे बोलून गेला, की जणू भारतीय संघ काहीच करणार नाही. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. त्यांच्या संघाची बऱ्यापैकी बांधणी झालीय. पण शादाब खानने हे समजून घ्यावं, की रोहित शर्माचा हा संघ थोडा वेगळा आहे. हार नाही, प्रहार करण्यावर त्यांचा विश्वास आहे. रोहितच्या संघाला पलटवार करणं, ठाऊक आहे.
यंदा आशिया कप यूएई मध्ये होतोय. त्यांचा रेकॉर्ड थोडा चांगला आहे. पण त्यांनी ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, भारत आशियातील सर्वात यशस्वी संघ आहे. त्याशिवाय रोहित शर्माचं नेतृत्व टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर आहे. अजून तरी पराभव भारतीय संघापासून लांबच आहे. एवढं निश्चित आहे, यावेळी भारतीय संघाचा सामना करणं, पाकिस्तानसाठी सोपं नसेल.