AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shaheen Shah Afridi : शाहीन आफ्रिदीला इंग्रजी प्रश्नच समजला नाही, मग त्याने उत्तर काय दिलं? VIDEO

Shaheen Shah Afridi : पाकिस्तानी क्रिकेटपटूची इंग्रजी भाषा अनेकदा चर्चेचा विषय ठरते. आता पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शाहीन शाह आफ्रिदीला प्रश्न काय विचारला आणि त्याने उत्तर काय भलतच दिलं, ते या व्हिडिओमध्ये पाहा.

Shaheen Shah Afridi : शाहीन आफ्रिदीला इंग्रजी प्रश्नच समजला नाही, मग त्याने उत्तर काय दिलं? VIDEO
shaheen shah afridi Image Credit source: PTI
| Updated on: Jun 17, 2024 | 4:23 PM
Share

T20 वर्ल्ड कप 2024 ने फक्त पाकिस्तान क्रिकेटचीच नाही, तर त्यांच्या इंग्रजीची सुद्धा पोलखोल केली आहे. यात नवीन असं काही नाहीय. पाकिस्तानी क्रिकेटपटूंची इंग्रजी भाषा अनेकदा मस्करीचा विषय बनते. T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आयर्लंड विरुद्धच्या मॅचनंतर असच काहीतरी घडलं. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. आयर्लंड विरुद्धच्या मॅचनंतर शाहीन शाह आफ्रिदीला जो प्रश्न विचारण्यात आला होता, त्याच उत्तर त्याने भलतच दिलं.

पोस्ट मॅच प्रेजेंटेशनमध्ये त्याला कॅच घेताना उस्मान खान सोबत टक्कर झाली, त्या बद्दल प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावर त्याने वेगळच उत्तर दिलं. यातून शाहीन शाह आफ्रिदीला इंग्रजी भाषेच किती ज्ञान आहे ते समजलं. सोशल मीडियावर शाहीन शाह आफ्रिदीच्या उत्तराचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

इंग्रजीत विचारलेला हा प्रश्न त्याला समजला नसावा

आयर्लंडची बॅटिंग सुरु असताना 14 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर शाहीन शाह आफ्रिदी आणि उस्मान खानची धडक झाली. दोन्ही खेळाडू मार्क आडायरची कॅच घेण्यासाठी पळाले. याच दरम्यान परस्परांना धडकून मैदानात पडले. धडक कशी झाली? असा प्रश्न शाहीन शाह आफ्रिदीला विचारण्यात आला होता. कदाचित इंग्रजीत विचारलेला हा प्रश्न त्याला समजला नसावा. त्याने चुकीच उत्तर दिलं. शाहीनने उत्तर दिलं की, “नवीन चेंडू स्विंग होत होता आणि जुन्या चेंडूकडून मदत मिळत होती. एक बॉलिंग युनिट म्हणून आम्ही चांगला परफॉर्मन्स केला”

आयर्लंडची पहिली बॅटिंग

या मॅचमध्ये आयर्लंडने पहिली बॅटिंग केली. पाकिस्तानच्या दमदार गोलंदाजीसमोर त्यांनी फक्त 106 धावा केल्या. पाकिस्तानला विजयासाठी 107 धावांच टार्गेट मिळालं. 7 चेंडू आधी तीन विकेट राखून पाकिस्तानने विजय मिळवला.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.