AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ 3rd ODI: Shikhar Dhawan चा गेम ओव्हर, असं काम केलं, आता टीममधून बाहेर होणं निश्चित!

IND vs NZ 3rd ODI: शिखर धवन कुठे चुकलाय? आणि त्याच्याजागी दुसरा खेळाडू कोण येऊ शकतो?

IND vs NZ 3rd ODI: Shikhar Dhawan चा गेम ओव्हर, असं काम केलं, आता टीममधून बाहेर होणं निश्चित!
Shikhar-DhawanImage Credit source: AFP
| Updated on: Nov 30, 2022 | 2:32 PM
Share

ख्राइस्टचर्च: न्यूझीलंड विरुद्ध T20 सीरीज जिंकल्यानंतर टीम इंडियाकडून वनडे सीरीजमध्ये चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती. पण फलंदाजांनी खराब कामगिरी केली. खासकरुन कॅप्टन शिखर धवनने निराश केलं. त्याच्यासाठी ही वनडे सीरीज खूप महत्त्वाची होती. वनडे सीरीजमध्ये शिखर धवनने 103 धावा केल्या. यात पहिल्या सामन्यातील 72 धावा आहेत. त्यानंतर दोन वनडेमध्ये तो अपयशी ठरला. धवन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमध्येही अपयशी ठरला होता. त्याच्या बॅटमधून फक्त 25 धावा निघाल्या होत्या.

स्ट्राइक रेटमुळे धोका

शिखर धवनने कमी धावा करणं हा चिंतेचा विषय आहे. पण त्याचबरोबर एक अशा आकड्यामुळे कदाचित पुढच्यावर्षी वर्ल्ड कप टीममध्ये त्याचं सिलेक्शन होणार नाही. शिखर धवनच्या स्ट्राइक रेटमुळे त्याच्या करिअरला धोका निर्माण झालाय.

कॅलेंडर इयरमध्ये स्ट्राइक रेट कसा आहे?

शिखर धवनने वनडे सीरीजमध्ये 34 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 80 पेक्षा कमी आहे. धवन फक्त या सीरीजमध्ये धीम्या गतीने खेळला असं नाहीय, संपूर्ण कॅलेंडर इयरमध्ये त्याचा स्ट्राइक रेट चिंतेचा विषय आहे.

या खराब रेकॉर्डमध्ये धवनची एंट्री

धवनने यावर्षी 19 वनडे इनिंगमध्ये फक्त 75.11 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. 2008 नंतर कुठल्याही भारतीय फलंदाजाचा हा सर्वात कमी स्ट्राइक रेट आहे. 2007 मध्ये गांगुली (71.93), 2008 मध्ये गौतम गंभीर (74.67) यांची नाव होती. आता धवनची या खराब रेकॉर्डमध्ये एंट्री झालीय.

….तर धवनच्या अडचणी वाढतील

पुढच्यावर्षी वनडे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. यासाठी काही युवा खेळाडू आपली दावेदारी सांगत आहेत. यात शुभमन गिल आहे. यावर्षी वनडेमध्ये शुभमन गिलने कमालीच प्रदर्शन केलय. वनडेमध्ये गिलची सरासरी 60 पेक्षा जास्त आहे. त्याचा स्ट्राइक रेटही 100 पेक्षा जास्त आहे. अशावेळी टीम इंडियामध्ये युवा आणि फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूला प्राधान्य मिळू शकतं. बांग्लादेशच्या वनडे सीरीजमध्ये इशान किशन खेळणार आहे. त्याची बॅट चालली, तर धवनच्या अडचणी वाढतील.

इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....