
Shivam Dube T20 World Cup Medal: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद भारताने मिळवलं. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला आणि जेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरलं. या जेतेपदाच्या प्रवासात संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांचं नाव आघाडीवर येते. पण या विजयात शिवम दुबेचं योगदान विसरून चालणार नाही. कारण कठीण काळात शिवम दुबेने जोरदार फटकेबाजी करत संघाला तारलं. शिवम दुबे आता जेतेपदाचा मान घेऊन घरी परतला आहे. यावेळी त्याने आपलं टी20 वर्ल्डकप मेडल एका खास व्यक्तीच्या गळ्यात घातलं. कारण क्रिकेटमध्ये इतका मोठा पल्ला गाठण्यात या व्यक्तीचा मोलाचा हातभार होता. या व्यक्तीने शिवम दुबेची रोज तेल मालिश केली. कारण शिवम कठीण सरावातून स्वत:ला सावरू शकेल. दुबेला रोज तेल मालिश करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याचे वडील राजेश दुबे आहेत. त्यांना व्यवसायात फटका पण मुलाला क्रिकेटपटू जिद्द काही सोडली नाही.
शिवम दुबेने वडिलांना मेडल घातल्याचे काही फोटो पोस्ट केले आहे. त्यात त्याने लिहिलं की, माझ्या जीवनातील खरा हिरो. शिवम दुबे सहा वर्षांचा असताना त्याच्यातील क्रिकेटची आवड त्याच्या वडिलांनी हेरली होती. त्यानंतर त्याला क्रिकेटपटू करण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं. त्याच्यासाठी घराच्या मागे टर्फ खेळपट्टी तयार केली. सकाळ संध्याकाळ तासंतास तिथे शिवम सराव करायचा. तर वडील रोज त्याला 500 चेंडू टाकायचे. जवळपात 10 वर्षे त्यांनी शिवमसोबत असाच सराव केला. इतकंच काय तर शिवम सहा वर्षांचा असल्यापासून मुंबईत चंद्रकांत पंडित क्रिकेट अकादमती जायचा. त्यानंतर सतीश सामंत यांनी ट्रेनिंग दिली. दुबे सरावानंतर थकून यायचा. त्याचा थकवा दूर करण्यासाठी वडील रोज त्याची तेल मालिश करायचे.
शिवम 14 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा व्यवसाय ठप्प झाला. तसेच कुटुंबावर कर्जाचा डोंगरही उभा राहिला. त्यामुळे शिवम दुबेचं क्रिकेट पाच वर्षे बंद होतं. तसेच त्याचं वजनही 110 किलो झालं आणि मानसिक तणावात गेला होता. पण राजेश दुबे यांनी यातूनही मार्ग काढला. त्यांनी शिवमला पुन्हा सराव करण्यात प्रवृत्त केलं. रोज 8 तास सराव करायचा. तर त्याचं वजनही 75 किलोपर्यंत आणलं. त्यामुळे शिवम दुबे आज जे काही आहे ते त्याच्या वडिलांमुळे.. त्यामुळे त्याच्यासाठी ते सुपर हिरो आहोत. शिवम दुबेने एक नाही तर दोन टी20 वर्ल्डकप जिंकले आहेत. यात त्याला प्रोत्साहान देण्याऱ्या वडिलांचं योगदान आहे.