टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत शोएब अख्तरची भविष्यवाणी, टीम इंडियाच्या चाहत्यांचा संताप

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेची अंतिम भारताने गाठली. यानंतर पाकिस्तानला पोटदुखी होणार यात काही नवीन नाही. भारताकडे या स्पर्धेचं यजमानपद असल्यापासून पाकिस्तानच्या कुरापती सुरू होत्या. आता भारताने अंतिम फेरी गाठल्याने पाकिस्तानी खेळाडूंनी न्यूझीलंडची बाजू घेतली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत शोएब अख्तरची भविष्यवाणी, टीम इंडियाच्या चाहत्यांचा संताप
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्याबाबत शोएब अख्तरची भविष्यवाणी, टीम इंडियाच्या चाहत्यांचा संताप
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 07, 2026 | 9:02 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने मोठ्या दिमाखात एन्ट्री मारली. या स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्यात भारताने एकही सामना गमावला नव्हता. अमेरिका, नामिबिया, नेदरलँड आणि पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानचा संघ सर्व सामने श्रीलंकेत खेळला, तरी भारताने पाकिस्तानला लोळवलं. त्यानंतर सुपर 8 फेरीत भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी झाला. या सामन्यात पराभव झाल्याने भारताचं उपांत्य फेरीचं गणित बिघडलं होतं. पण त्यानंतर टीम इंडियाने कमबॅक केलं. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला पराभूत करून उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी झाला. हा सामना हायस्कोअरिंग झाला. या सामन्यात भारताने विजयासाठी 253 धावा दिल्या होत्या. पण इंग्लंडने 246 धावांपर्यंत मजल मारली आणि भारताला 7 धावांनी विजय मिळाला. आता भारताचा अंतिम फेरीत न्यूझीलंडशी सामना होणार आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार याचं भाकीत वर्तवलं जात आहे. पण पाकिस्तानी आजी माजी खेळाडू्ंनी न्यूझीलंडला जेतेपदासाठी दावेदार मानलं आहे.

पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरचं म्हणणं ऐकून तर टीम इंडियाच्या चाहत्यांची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. शोएब अख्तर म्हणाला की, ‘जर खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असेल तर 175 ते 200 धावा खूप होतील. पण न्यूझीलंड संघाने 225 किंवा 250 धावा केल्या तर भारतावर दबाव वाढेल. भारत या सामन्यात पूर्ण तयारीनिशी उतरेल. पण 1.5 अब्ज लोकांचा दबाव असणार आहे. भारत या सामन्यात मजबूत दिसत आहे. पण क्रिकेटच्या हिशेबाने विचार करण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंडने आयसीसी जेतेपद जिंकावं.’

पाकिस्तानच्या इतर आजी माजी खेळाडूनीही न्यूझीलंडला जेतेपदासाठी पसंती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानची पोटदुखी काय आहे ते समजू शकतो. यापूर्वी भारताने टी20 वर्ल्डकप 2026, आशिया कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली आहे. त्यामुळे भारताला आणखी आयसीसी जेतेपद मिळालं तर पाकिस्तानचा तीळपापड झाल्याशिवाय राहणार नाही. आता अंतिम सामन्यात काय होतं याकडे लक्ष असणार आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरही पॅट कमिन्ससारखं वक्तव्य करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला सूर्यकुमार यादवने उत्तर दिलं आहे.

Follow Us