स्मृती आणि पलाशचं लग्न होणार की नाही? 7 डिसेंबरच्या तारखेबाबत मंधानाच्या भावाने खरं काय ते सांगितलं
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत रोज काही ना काही बातम्या समोर येत असतात. पलाश आणि स्मृतीचे वडील दोघेही रुग्णालयातून घरी परतले आहेत. मात्र त्यांच्या लग्नाबाबत पुढची अपडेट काही समोर येत नाहीत. असं असताना 7 डिसेंबरची तारीख समोर आली होती. त्यावर आता मंधानाचे भावाने स्पष्टीकरण दिलं आहे.

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नात ट्विस्ट आला आणि लग्नसोहळा थांबला. एखाद्या फिल्मी स्टोरीप्रमाणे सात फेरे घेणार तेव्हाच स्मृतीच्या वडिलांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर हा लग्नसोहळा थांबवण्याचा निर्णय घेतला गेला. 23 नोव्हेंबरला लग्नसोहळ्यात विघ्न आलं आणि लग्न लांबणीवर पडलं. त्यानंतर सोशल मीडियावर रोज काही ना काही वावड्या उठत आहे. पण दोन्ही कुटुंबियांकडून ठोस असं काहीच सांगितलं जात नाही. पलाशच्या आईने हे लग्न होईल असं सांगितलं. पण स्मृतीच्या कुटुंबियांकडून काहीच समोर आलेलं नाही. त्यात स्मृतीने सोशल मीडियावरून फोटो आणि व्हिडीओ डिलिट केले. स्मृतीच्या संघ सहकाऱ्यांनीही तीच कृती केली. स्मृतीची खास मैत्रिण असलेल्या राधा यादवने पलाश मुच्छलला अनफॉलो केलं. जेमिमा रॉड्रिग्सने वुमन्स बिग बॅश लीगमधून स्मृतीसोबत राहण्यासाठी माघार घेतली. असं सर्व घडत असताना स्मृती आणि पलाशचं लग्न 7 डिसेंबरला होणार अशी अफवा उडाली. अनेकांना तर ही बातमी खरीच वाटली. पण यावर स्मृती मंधानाच्या भावाने स्पष्टीकरण दिलं आहे.
स्मृती मंधानाचा भाऊ श्रवणने सोशल मीडियावरील चर्चा फेटाळून लावल्या आहेत. इतकंच काय तर या अफवांबाबत एका वाक्यात उत्तर देऊन मोकळा झाला आहे. श्रवण मंधानाने सांगितलं की, ‘मला या अफवांबाबत फार काही माहिती नाही. पण सध्या तरी लग्नाला स्थगिती आहे.’ त्यामुळे या दोन्ही काही तरी मोठं घडल्याची चर्चा आणि सोशल मीडियावर रंगली आहे. इतक्या अफवा उडाल्या असताना दोघंही व्यक्त होत नाहीत. त्यामुळे कुठे ना कुठे संशयाला वाव आहे. लग्न स्थगित होण्यासाठी स्मृतीच्या वडिलांची तब्येत नाही, तर पलाशने केलेली फसवणून असल्याचंही सोशल मीडियावर चाहते चर्चा करत आहेत.
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल 23 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार होते. आता दहा दिवसांचा कालावधी लोटला असून अधिकृत असं काहीच समोर येत नाही. त्यामुळे हे लग्न मोडलं की पुढे ढकललं याबाबत संभ्रम आहे. स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल जिथपर्यंत या लग्नाबाबत स्पष्टीकरण देत नाहीत. तोपर्यंत रोज काही ना काही वावड्या उठत राहणार यात काही शंका नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातही दोघांनी बायोत बदल केला आहे. यात नजर लागून नये असा सिम्बॉल टाकला आहे. त्यामुळे नेमकं काय सुरू आहे याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे.
