Shreyas Iyer, IPL 2022: अगदी तसंच घडलं, मुंबईचा मुलगा श्रेयस अय्यरवर IPL मध्ये पडला पैशांचा पाऊस

Shreyas Iyer Auction Price: मागच्या सीजनपर्यंत श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सकडून खेळायचा. त्याने आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्वही केले. मागच्यावर्षी खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस आयपीएलच्या पहिल्या सत्रात खेळू शकला नाही.

Shreyas Iyer, IPL 2022: अगदी तसंच घडलं, मुंबईचा मुलगा श्रेयस अय्यरवर IPL मध्ये पडला पैशांचा पाऊस
| Updated on: Feb 12, 2022 | 1:02 PM

मुंबई: IPL 2022 मेगा ऑक्शमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas iyer) कोट्यधीश बनला आहे. आक्रमक फलंदाजी, मोठे फटके खेळण्याची क्षमता आणि कर्णधारासारखा विचार करण्याची पद्धत यामुळे श्रेयस अय्यरवर मोठ्या प्रमाणात धनवर्षाव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सची (Delhi capitals) साथ सोडल्यानंतर श्रेयस अय्यरवर मोठी बोली लावली जाईल, असा अंदाज होता आणि घ़डलं सुद्धा तसंच. ऑक्शनमध्ये (Mega Auction) अय्यरच्या नावाच पुकार होताच त्याच्यावर मोठी बोली लागण्यास सुरुवात झाली. श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतलं. श्रेयसला 12.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. श्रेयसला केकेआरचा कॅप्टन बनू शकतो. कारण सध्या त्यांच्याकडे दुसरा कुठलाही कर्णधार नाहीय. 2015 मध्ये पहिल्यांदा श्रेयस अय्यरवर बोली लागली होती. त्यावेळी दिल्लीने अय्यरला 2.6 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

मागच्या सीजनपर्यंत श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सकडून खेळायचा. त्याने आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्वही केले. मागच्यावर्षी खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस आयपीएलच्या पहिल्या सत्रात खेळू शकला नाही. त्यावेळी दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंतकडे सोपवण्यात आलं. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात संघात परतल्यानंतरही दिल्लीने त्याला कर्णधार बनवलं नाही. त्यामुळे त्याने दिल्लीचा संघ सोडला.

काल संघ अडचणीत सापडलेला असताना श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिज विरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. श्रेयसने 111 चेंडूत 80 धावा करताना नऊ चौकार लगावले. वेस्ट इंडिज (West indies) विरुद्ध वनडे सीरीज सुरु होण्याच्या चार दिवस आधी श्रेयस अय्यर कोरोनाची लागण झाली. त्यामुळे पहिल्या दोन वनडे सामन्यांना तो मुकला. आज थेट अर्धशतकी खेळी साकारुन, त्याने संघात जोरदार पुनरागमन केलं. दक्षिण आफ्रिकेतील तिन्ही वनडे सामन्यांमध्ये त्याला प्रभाव पाडता आला नव्हता.