AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅप्टन Shubman Gill चं मॅचेस्टरमध्ये ऐतिहासिक शतक, 35 वर्षांची प्रतिक्षा अखेर संपवली

Shubman Gill Century ENG vs IND 4th Test : शुबमन गिल याने कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी मालिकेत इंग्लंड विरुद्ध चौथं शतक झळकावलं आहे. शुबमनने यासह अनेक विक्रमांची बरोबरी केली.

कॅप्टन Shubman Gill चं मॅचेस्टरमध्ये ऐतिहासिक शतक, 35 वर्षांची प्रतिक्षा अखेर संपवली
Shubman Gill Century ManchesterImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 27, 2025 | 5:56 PM
Share

टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल याने मँचेस्टरमध्ये इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या कसोटीतील पाचव्या दिवशी झुंज देत इतिहास घडवला आहे. शुबमनने दिवसातील पहिल्या सत्रात शतक ठोकत धमाका केला आहे. भारताने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात झटपट 2 विकेट्स गमावल्या. त्यानंतर केएल राहुल आणि शुबमन गिल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. केएल राहुल पाचव्या दिवशी आऊट झाला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी केली. तर शुबमनने दुसरी बाजू लावून धरत शतक झळकावलं.

कर्णधार शुबमनचं मँचेस्टरमध्ये शतक

शुबमनने 228 बॉलमध्ये 12 फोरसह 43.86 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं. शुबमनचं कसोटी कारकीर्दीतील हे नववं शतक ठरलं. शुबमने या शतकासह अनेक विक्रमांची बरोबरी साधली. तसेच शुबमनने भारताची 35 वर्षांची प्रतिक्षा संपवली. शुबमन मँचेस्टरमध्ये 1990 नंतर शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. भारतासाठी या मैदानात शेवटचं कसोटी शतक हे सचिन तेंडुलकर याने केलं होतं. सचिनचं ते पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं होतं. त्यानंतर एकाही भारताला अशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र आता शुबमनने शतक झळकावत साडे तीन दशकांची प्रतिक्षा संपवली.

2 दिग्गजांची बरोबरी

शुबमनने या शतकासह दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी केली. शुबमन एका कसोटी मालिकेत सर्वाधिक 4 शतकं करणारा एकूण तिसरा तर भारताचा दुसरा कर्णधार ठरला. शुबमनने याबाबतीत दिग्गज सर डॉन ब्रॅडमॅन आणि सुनील गावसकर या दोघांच्या विक्रमाची बरोबरी साधली. ब्रॅडमॅन आणि गावसकर या दोघांनी मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून ही कामगिरी केली होती. तर शुबमनने परदेशात हा कारनामा करुन दाखवला आहे.

कसोटी मालिकेत सर्वाधिक शतकं करणारे कर्णधार

  1. सर डॉन ब्रॅडमॅन, 4 शतकं, विरुद्ध भारत, 1947/48
  2. सुनील गावसकर, 4 शतकं, विरुद्ध वेस्ट इंडिज, 1978/79
  3. शुबमन गिल, 4 शतकं, विरुद्ध इंग्लंड, 2025

मँचेस्टरमध्ये 1990 नंतर कसोटी शतक

शुबमनआधी 1990 साली मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारतासाठी 2 फलंदाजांनी शतक केलं होतं. पहिल्या डावात कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने शतक झळकावलं होतं. तर दुसऱ्या डावात सचिनने शेकडा पूर्ण केला होता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.