AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill: शुभमन गिलकडून सेंच्युरी ठोकून सिलेक्शनच सेलिब्रेशन, 11 फोर, 9 SIX, पहा VIDEO

Shubman Gill: टीम इंडियात निवड झाल्यानंतर शुभमन गिलने कसली धमाकेदार बॅटिंग केली.

Shubman Gill: शुभमन गिलकडून सेंच्युरी ठोकून सिलेक्शनच सेलिब्रेशन, 11 फोर, 9 SIX, पहा VIDEO
Shubhaman-GillImage Credit source: BCCI
| Updated on: Nov 01, 2022 | 3:22 PM
Share

नवी दिल्ली: टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलची न्यूझीलंड आणि बांग्लादेश सीरीजसाठी टीम इंडियात निवड झालीय. सोमवारी टीमची घोषणा झाली आणि शुक्रवारी शुभमन गिलने धमाका केला. सय्यद मुश्ताक अली टुर्नामेंटमध्ये क्वार्टर फायनलचा सामना झाला. शुभमन गिलचे या मॅचमध्ये सेंच्युरी ठोकली. त्याने एकप्रकारे टीम इंडियातील सिलेक्शनच सेलिब्रेशन केलं.

टीमला संकटातून बाहेर काढलं

पंजाबकडून खेळणाऱ्या शुभमन गिलने 57 चेंडूत 126 धावा फटकावल्या. या दरम्यान त्याने 11 चौकार आणि 9 षटकार ठोकले. शुभमनने आपल्या इनिंगमध्ये 229 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. पंजाबने एकवेळ 10 धावात 2 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर शुभमन गिलने दमदार इनिंग खेळून टीमला संकटातून बाहेर काढलं.

पंजाबने किती धावा केल्या?

शुभमन गिलच्या इनिंगच्या बळावर पंजाबने कर्नाटक विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 225 धावा केल्या. शुभमन गिलशिवाय अनमोलप्रीत सिंहने 59 धावा फटकावल्या. दोघांनी मिळून 82 चेंडूत 151 धावांचा पार्टनरशिप केली. शुभमन गिलचा आधी टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आला होता. त्यानंतर आता वनडे आणि आता टी 20 टीममध्ये त्याला स्थान मिळालय.

न्यूजीलंड टी20 सीरीजसाठी टीम- हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक

न्यूजीलंड वनडे सीरीजसाठी टीम- शिखर धवन (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी