IND vs NZ: शुबमन गिल कोणाच्या प्रेमात पडला? वडोदराच्या नवीन स्टेडियममध्ये झाला खुलासा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना 11 जानेवारीला होणार आहे. हा सामना वडोदराच्या नव्या मैदानात होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. काय म्हणाला ते जाणून घ्या..

IND vs NZ: शुबमन गिल कोणाच्या प्रेमात पडला? वडोदराच्या नवीन स्टेडियममध्ये झाला खुलासा
IND vs NZ: शुबमन गिल कोणाच्या प्रेमात पडला? वडोदराच्या नवीन स्टेडियममध्ये झाला खुलासा
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 10, 2026 | 3:18 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना वडोदरात होणार आहे. हा सामना खास असणार आहे. कारण या शहरातील लोकांसाठी आणि क्रिकेट संघासाठी हा दिवस ऐतिहासिक असणार आहे. कारण बऱ्याच वर्षानंतर या शहरात भारतीय पुरूष संघ वडोदरामध्ये सामना खेळणार आहे. तेही एका नवा स्टेडियममध्ये… भारत न्यूझीलंडमधील पहिल्या वनडे सामन्यासह पुरूष संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने ही या स्टेडियमबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे मैदान आवडीची जागा असल्याचं सांगण्यास विसरला नाही.

शुबमन गिलचं टीम इंडियात पुनरागमनचं झालं नाही तर वनडे संघाचं नेतृत्वही हाती घेतलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नेतृत्व केल्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळला नव्हता. भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने स्टेडियम सुंदर असल्याचं सांगत सुविधांचं कौतुक केलं आहे. सर्वात आवडीची गोष्ट म्हणजे ड्रेसिंग रूम…संघात पुनरागमन झाल्यानंतर कर्णधार शुबमन गिलने सांगितलं की, ‘स्टेडियम खूप मस्त आहे. इथल्या सुविधा आणि ड्रेसिंग रूममध्ये खूप जागा आहे. कोणत्याही स्टेडियममध्ये आम्ही पहिल्यांदा तिथलं ड्रेसिंग रूम पाहतो. आम्हाला हे खूपच आवडलं. मैदानही खूप चांगलं आहे.’ गिलच नाही तर स्टार ओपनर फलंदाज यशस्वी जयस्वालला हे स्टेडियम खूपच आवडलं.

टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. ‘वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून माझी ही पहिलीच मालिका आहे. यासाठी मी खूपच उत्साहित आहे. या आव्हानाची मी वाट पाहात होतो. प्रत्येकाने देशांतर्गत क्रिकेट खेळलं आहे. सर्वच चांगल्या लयीत आहेत. न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यास खूपच उत्सुक आहोत.’ शुबमन गिलची या वनडे मालिकेत कसोटी लागणार आहे. कारण त्याला विजय हजारे ट्रॉफीतही लय मिळाली नाही. त्यामुळे त्याच्यावर धावा करण्याचं दडपण असणार आहे. दुसरीकडे, टी20तील सुमार कामगिरीमुळे त्याला वर्ल्डकप संघातूनही डावलण्यात आलं होतं.