Dog Attack Video : श्रेयस अय्यर कुत्र्याच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला! शेवटच्या क्षणी झालं असं की…
मधल्या फळीतील फलंदाज आणि वनडे उपकर्णधार श्रेयस अय्यरचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे. जवळपास अडीच महिन्यांच्या ब्रेकनंतर परतला आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने चांगली कामगिरी केली आणि आपला फॉर्मही दाखवून दिला आहे. पण या टीम इंडियातील पदार्पण अजून लांबलं असतं, कारण...

श्रेयस अय्यर आणि दुखापत आता हे जणू समीकरण ठरलं आहे. श्रेयस अय्यरला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे सलग खेळण्याची संधी हातून गमवावी लागत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याचं टीम इंडियात कमबॅक झालं होतं. पण तिसऱ्या वनडे सामन्यात दुखापत झाली आणि अडीच महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर व्हावं लागलं. आता फिट अँड फाईन झाला असून विजय हजारे ट्रॉफीत त्याने चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याचं संघात कमबॅक झालं आहे. पण या कमबॅकलाही ग्रहण लागण्याची शक्यता होती. कारण श्रेयस अय्यर कुत्र्याच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला आहे. वडोदरामध्ये पोहोचल्यानंतर एक कुत्र्याला गोंजारणं त्याच्या अंगलट आलं असतं. नेमकं काय घडलं आणि कसं काय झालं ते जाणून घ्या
श्रेयस अय्यर हा श्वानप्रेमी आहे. त्याच्या घरीही कुत्रा आहे. त्यामुळे त्याचं श्वानप्रेम काही लपलेलं नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, श्रेयस अय्यर गाडीत बसण्यासाठी जात होता. अय्यरने एक छोट्या मुलीला ऑटोग्राफ दिली आणि पुढे गेला. तिथे आणखी एक चाहती होती. त्या चाहतीच्या कुत्र्याला त्याने पाहीलं. तिने कुत्र्याला वर उचलून घेतलं होतं. तेव्हा श्रेयस अय्यरमधील श्वानप्रेम उफाळून आलं. त्याने त्या कुत्र्याला गोंजारण्यासाठी हात पुढे केला. तेव्हा त्या कुत्र्याने त्याला क्षणाचाही विलंब न करता चावा घेण्याचा प्रयत्न केला. पण श्रेयस अय्यरच्या सतर्कतेमुळे त्याने हात तात्काळ मागे घेतला. त्याच्या चाहतीनेही लगेच तात्काळ कुत्र्याला मागे घेतलं. हा क्षण पाहाणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला.
View this post on Instagram
श्रेयस अय्यरलाही या प्रकारामुळे धक्का बसला. पण त्याने चेहऱ्यावर तसं काही दाखवून दिलं नाही. हसतच पुढे निघून गेला. पण कुत्रा चावला असता तर या मालिकेला पुन्हा मुकावं लागलं असतं. आधीच फिटनेसची चिंतेने श्रेयस ग्रस्त आहे. त्यात असं काही घडलं असतं तर कमबॅक लांबलं असतं. त्यामुळे जर असं काही घडलं असतं तर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानापासून दूर जावं लागलं असतं.
