AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या बाबरसेनेला शुबमन गिल एकटाच बस्स…! टॉप पाच फलंदाजाच्या नावावर नकोसा विक्रम

पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून तिसऱ्या कसोटीत पराभवाचं सावट आहे. त्यामुळे क्लिन स्विप मिळणार हे नक्की झालं आहे. कारण इंग्लंडने तिसऱ्या कसोटीतही फॉलोऑन दिला आहे. असं असताना पाकिस्तानची पाच डावातील कामगिरी पाहता एकटा शुबमन गिल भारी पडला आहे.

पाकिस्तानच्या बाबरसेनेला शुबमन गिल एकटाच बस्स...! टॉप पाच फलंदाजाच्या नावावर नकोसा विक्रम
पाकिस्तानच्या बाबरसेनेला शुबमन गिल एकटाच बस्स...! टॉप पाच फलंदाजाच्या नावावर नकोसा विक्रमImage Credit source: pti/icc twitter
| Updated on: Sep 10, 2026 | 9:19 PM
Share

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला क्लिन स्विप मिळणार हे जवळपास नक्की झालं आहे. कारण तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तान पराभवाचा वेशीवर आहे. कारण पहिल्या डावात पाकिस्तानचा संघ 133 धावांवर सर्व बाद झाला. त्यामुळे इंग्लंडकडे 320 धावांची आघाडी आहे. फॉलोऑनमध्ये या धावा गाठणं पाकिस्तानला कठीण जाणार आहे. पण पहिला डाव संपला आणि एक विचित्र आकडा समोर आहे. पाकिस्तानने इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत 5 डावात एकूण 743 धावा केल्या. भारतीय कर्णधार शुबमन गिलने इंग्लंड दौऱ्यात 754 धावा एकट्याने केल्या होत्या. त्यामुळे पाच डावातील सरासरी पाहिली तर शुबमन गिल वरचढ ठरला आहे. शुबमन गिलने मागच्या वर्षी पाच कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. शुबमन गिलने 4 शतक ठोकले आणि 75.40 सरासरीने धावा केल्या.

पाकिस्तानने पाच डावात एकदाही 200 आकडा गाठला नाही

पाकिस्तानची इंग्लंड दौऱ्यात पुरती नाचक्की झाली आहे. दुसरा कसोटी सामना गमावताच निम्म्याहून अधिक संघ बदलला. त्यामुळे काही बदल होईल असं वाटलं होतं. पण येथेही तसंच झालं. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात पाकिस्तानचा संघ 133 धावांवर सर्वबाद झाला. आतापर्यंत खेळलेल्या पाच डावात एकदाही 200 धावांचा आकडा गाठता आलेला नाही. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 171 आणि दुसऱ्या डावात 135 धावा केल्या. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 110 आणि दुसऱ्या डावात 194 धावा केल्या. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 133 धावांवर पाकिस्तानचा संघ गारद झाला. पाकिस्तानही एकही फलंदाज शतक ठोकू शकला नाही. यात फक्त दोन अर्धशतकं आली.

तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तानचे टॉप 5 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं. पाकिस्तानच्या टॉप 5 फलंदाजांच्या नावावर एकेरी आकडा होता. सऊद शकील काही काळ तग धरून होता आणि 43 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाजी मोठी खेळी करू शकला नाही.

Follow Us
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?