AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | विराट-रोहितला जे जमलं नाही, ते रांचीमध्ये शुभमनने दाखवलं करुन, त्याला प्रिन्स नाही, किंग बोला

IND vs ENG | रांची टेस्टमध्ये टीम इंडियाने इंग्लंडला 5 विकेटने हरवून सीरीज जिंकली. पहिली कसोटी गमावल्यानंतर टीम इंडियाने पुढचे तिन्ही सामने जिंकून मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली. ही आघाडी घेतानाच शुभमन गिलने असं काही करुन दाखवलय की, विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे सारख्या दिग्गजांच्या तो पुढे निघून गेलाय.

IND vs ENG | विराट-रोहितला जे जमलं नाही, ते रांचीमध्ये शुभमनने दाखवलं करुन, त्याला प्रिन्स नाही, किंग बोला
Ind vs Eng test series shubhaman Gill
| Updated on: Feb 27, 2024 | 7:59 AM
Share

IND vs ENG | रांची टेस्ट टीम इंडियाने जिंकली. पहिल्या डावात पिछाडीवर पडूनही टीम इंडियाने रांची कसोटी 5 विकेटने जिंकली. हा विजय खूप खास आहे. कारण टीम इंडियाने टॉस गमावला होता. पीचवर फलंदाजी करणं सोप नव्हतं. त्याशिवाय इंग्लंडकडे आघाडी होती. महत्त्वाच म्हणजे टीमकडे अनुभवी फलंदाजांची कमतरता होती. मात्र, तरीही मॅच टीम इंडियाने आरामात जिंकली. टीम इंडियाच्या या विजयाचा हिरो ठरला ध्रुव जुरेल. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 90 धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 39 धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये आणखी एका फलंदाजाने कमालीची बॅटिंग केली. त्याने टीम इंडियाच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली. रांची टेस्टमध्ये शुभमन गिलने नाबाद 53 धावा केल्या. आपल्या या इनिंगमध्ये शुभमन गिलने असं काही केलं की, ज्यावर विश्वास ठेवणं बऱ्याच जणांसाठी कठीण जाईल.

शुभमन गिलने दुसऱ्या डावात नाबाद 53 धावा करताना 210 धावांचा एक खास आकडा गाठला. गिलने आपल्या करिअरमध्ये जिंकलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या इनिंगमध्ये 210 धावा केल्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल विराट, रोहित, रहाणे, गंभीरसारख्या खेळाडूंनी सुद्धा संपूर्ण करिअरमध्ये जिंकलेल्या कसोटी सामन्यात चौथ्या इनिंगमध्ये इतक्या धावा केलेल्या नाहीत. गिल या सगळ्या दिग्गजांच्या पुढे निघून गेलाय.

गिलने सिद्ध केलं की….

जगतील कुठल्याही फलंदाजाला विचारा, कसोटी क्रिकेटमध्ये धावा बनवताना सर्वात जास्त अडचण केव्हा येते?. सगळ्यांच एकच उत्तर असेल, कसोटीच्या दुसऱ्याडावात. पण गिलने इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये दुसऱ्याडावातच कमालीची बॅटिंग केलीय. गिलने या टेस्ट सीरीजच्या दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये शानदार शतक झळकावलं. विशाखापट्टनममध्ये त्याने 104 धावा केल्या. राजकोट टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 91 धावा केल्या. आता रांची टेस्टच्या दुसऱ्याडावात या खेळाडूने नाबाद 52 धावा केल्या. म्हणजे गिलने या सीरीजच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 247 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 61 पेक्षा जास्त आहे. शुभमन गिलने सिद्ध केलय, कठीण काळात तो ढेपाळत नाही, तर अजून प्रखरतेने खेळतो.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले