Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ‘या’ दिग्गजाची टीम इंडियात एन्ट्री! इंग्लंड मालिकेपासून मोठी जबाबदारी

Indian Cricket Team : टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्याआधी बीसीसीआयने मोठी खेळी केली आहे. जाणून घ्या.

Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी या दिग्गजाची टीम इंडियात एन्ट्री! इंग्लंड मालिकेपासून मोठी जबाबदारी
rohit sharma and gautam gambhir
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 16, 2025 | 11:31 PM

टीम इंडिया 2025 या वर्षात 22 जानेवारीपासून पहिली मालिका खेळणार आहे. टीम इंडिया मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर उभयसंघात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. बीसीसीआयने टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर कोचिंग स्टाफमध्ये बदल केले होते. कोचिंग स्टाफमध्ये 2 सहाय्यक प्रशिक्षकांचा समावेश करण्यात आला होता. मात्र बॅटिंग कोचच्या भूमिकेत कुणाीच नव्हता. टीम इंडियाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्या निराशाजनक कामगिरी केली. त्यानंतर बीसीसीआय एक्शन मोडमध्ये आली आहे. त्यामुळे बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने कोचिंग स्टाफमध्ये नव्या भिडूची एन्ट्री केली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सितांशु कोटक बॅटिंग कोच!

सौराष्ट्र टीमचे माजी कर्णधार सितांशु कोटक टीम इंडियाचे बॅटिंग कोच म्हणून जबाबदारी पाहणार आहेत. इएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, कोटक 22 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या टी 20i मालिकेपासून कार्यभार सांभाळणार आहेत.

सितांशु कोटक यांनी 2013 साली फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. कोटक यांची क्रिकेट कारकीर्द ही 20 वर्षांची आहे. कोटक 2019 पासून बंगळुरुतील एनसीएमध्ये बॅटिंग कोच म्हणून कार्यरत होते. तसेच कोटक यांनी अनेकदा व्हीव्हीएस लक्ष्मणसह टीम इंडिया एसाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर एक्शन मोड

क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 3-1 अशा पराभवानंतर बीसीसीयची रिव्हीव्यू मिटींग पार पडली. या बैठकीत कोचिंग स्टाफमध्ये बॅटिंग कोचचा समावेश करण्याचा निर्णय करण्यात आला. त्यानंतर कोटक यांची नियुक्ती करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

कोटक यांचं फर्स्ट क्लास कारकीर्द

दरम्यान कोटक यांनी 130 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. कोटक यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 41 च्या सरासरीने 8 हजार 61 धावा केल्या आहेत. कोटक यांनी या दरम्यान 15 शतकं झळकावली आहेत.