SL vs AFG 3rd Odi | श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सीरिजसाठी ‘काँटे की टक्कर’, कोण जिंकणार?

Sri Lanka vs Afghanistan 3rd Odi | श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना हा 7 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

SL vs AFG 3rd Odi | श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सीरिजसाठी 'काँटे की टक्कर', कोण जिंकणार?
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 11:16 PM

कोलंबो | आयपीएल 16 व्या मोसमानंतर अफगाणिस्तान टीम 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर गेली. या दौऱ्यात श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. अफगाणिस्तान टीमचं कर्णधारपद हे हशमतुल्लाह शाहिदी याच्याकडे आहे. तर श्रीलंकेची कॅप्टन्सी दासून शनाका करतोय. या 3 पैकी 2 एकदिवसीय सामने पार पडले आहेत. अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर 6 विकेट्सने विजय मिळवला. अफगाणिस्तानने विजयी सलामी देत 1-0 ने आघाडी घेतली. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने जोरदार मुसंडी मारली. श्रीलंकेने दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर 132 धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवला.

श्रीलंकेने या विजयाचं खातं उघडलं. इतकंच नाही, तर श्रीलंकेच्या विजयामुळे 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यासाठी आणि सीरिजसाठी श्रीलंका-अफगाणिस्तान यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. अफगाणिस्तानला सामना जिंकून श्रीलंकेला घरातच चितपट करण्याची संधी आहे. तर श्रीलंकेसमोर अफगाणिस्तानचं आव्हान असणार आहे. कारण अफगाणिस्तानने पराभूत केल्यास श्रीलंकेवर घरात मालिका गमावण्याचा धोका आहे. त्यामुळे आता या तिसऱ्या सामन्यामध्ये क्रिकेट चाहत्यांना नक्कीच चढाओढ पाहायला मिळणार आहे.

दरम्यान श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना हा टीव्हीवर सोनी नेटवर्क पाहता येईल. तसेच डिजीटल स्ट्रीमिंग श्रीलंका क्रिकेट युट्यूब चॅनेलवर पाहता येईल.

हे सुद्धा वाचा

अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम श्रीलंका | दासून शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चारिथ असालंका, सदीरा समरविक्रमा, चमिका करुणारत्ने, दुशान हेमंथा, वानिंदु हसरंगा, लहिरु कुमारा दुष्मंथा चमिरा, कसून राजिथा, मथिशा पथिराना आणि महीष तीक्षणा

श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अफगाणिस्तान टीम | हशमतुल्लाह शाहिदी (कप्तान), रहमत शाह, रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखेल, अजमतुल्लाह ओमारजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, अब्दुल रहमान, फजलहक फारुकी आणि फरीद अहमद मलिक.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.