दुष्काळाचं खातं मुंढेंकडे द्या; संजय राऊतांची मागणी, छगन भुजबळ स्पष्टच बोलले, काय म्हणाले?
Chhagan Bhujbal News: तुकाराम मुंढेंकडे असलेलं खातं अतिशय महत्त्वाचं आहे, संजय राऊतांच्या मागणीवर छगन भुजबळांनी मोठा दावा केला आहे.

महाराष्ट्रातील काही तालुक्यात दुष्काळ घोषित केला आहे. यावर मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पहिली फेरी झालेली आहे. आणखीन काही लोक मागण्या घेऊन पुढे येतील. आमचं गाव याच्यातून सुटलेला आहे किंवा तालुका सुटलेला आहे. त्या संदर्भामध्ये पुन्हा चौकशी करून ती सुद्धा गाव याच्यामध्ये घेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जाणार आहेत. हा पहिला भाग झाला. दुसरे जे आहेत त्यांना सुद्धा न्याय दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जे भाष्य केले त्यावर मी कमेंट करू शकत नाही. काँग्रेस मोर्चाबाबत मला काही कल्पना नाही. ते का असं बोलतात मला कल्पना नाही. दुष्काळ आणि पुनर्वसन खातं तुकाराम मुंडेंकडे द्या, असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. यावर भुजबळांनी सांगितलं की, ठीक आहे त्याचं ते मत आहे. माझं मत मात्र हेच आहे. तुकाराम मुंढेंकडे दिलेलं खातं जे आहे ते अतिशय महत्त्वाचं खातं आहे. दुष्काळाचे पैसे देणे घेणे हे होऊ शकते. परंतु नाही त्या गोष्टी आम्हाला खायला घातल्या हॉटेल रेस्टॉरंट मधून किंवा इतर ठिकाणाहून. पनीर दुधाच्या बाबतीमध्ये, औषधाच्या बाबतीमध्ये. कित्येक पटीने औषधे महाग केली जातात.
ते म्हणाले की, पाच पंचवीस रुपयांची औषधे पार दीड हजार रुपये पर्यंत जातात. या सर्व गोष्टी लहान-लहान आहेत. विशिष्ट दूधमध्ये युरिया टाकतात. केमिकलचे दूध तयार करतात. लहानपासून मोठ्यापर्यंत किडन्या संपतात. हा जो प्रकार सुरू आहे माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या सर्व बाबींवर कंट्रोल आणणं. मला कल्पना आहे अमेरिका व इतर ठिकाणी अशा प्रकारचे सापडले तर त्याला फार मोठी शिक्षा आहे. तिथे आतापर्यंत जास्त कोणी लक्ष दिलेले नाही.
अरुण भाटिया, महेश झगडे दोघा तिघांनी काम करण्याचा प्रयत्न केला. अनेक त्यामध्ये राजकारण सुद्धा घुसले. पुढे ते काही काम जाऊ शकले नाही. यावेळी तुकाराम मुंढे यांना सर्व सपोर्ट करता जे दुकानांमध्ये रेस्टॉरंट मध्ये आपल्याला चकाचक दिसत आहे. तेथे वाढलेले पदार्थ आत मध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये तयार केले. किती उंदीर, झुरळ येथे आहे. किती मिक्सिंग तिकडे आहे. याचे काही माहीत नसते. अनेक लोक रोगाला बळी पडतात. सगळ्यात महत्त्वाचं खातं हेच आहे असं मला वाटते, असं छगन भुजबळांनी सांगितले आहे.
विखे पाटलांवर बोलताना ते म्हणाले की, लिविंग रिलेशनशिप काय म्हणतात बिन लग्नाची सुद्धा राहतात. यात विशेष काय महत्त्वाचे आहे. त्यांचं म्हणण्याचे उद्देश असे आहे. लग्नांमध्ये जास्त खर्च करू नका. विशेषत: दुष्काळ वगैरे अशी परिस्थिती त्यावेळी समजून घेतले पाहिजे, असं भुजबळांनी सांगितले. मुख्य निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू चार तारखेला मोर्चा काढणार आहेत. यावर छगन भुजबळांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचे कामच आहे. आंदोलन करणे, धरणे धरणे, मोर्चे काढणे विरोधी पक्षाचे कामच आहे ना.
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, त्या आत्महत्या का व्हाव्या ते काही सांगता येत नाही. आपण कर्जमुक्ती सुरू केली आहे. त्यानंतर दुष्काळ जाहीर केला. वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती आपण शेतकऱ्यांना देणार आहोत. या सुद्धा का झाल्या याचा तपास करावा लागेल, असं त्यांनी सांगितलं. ग्रंथालय कंत्राट लाच प्रकरणी ते म्हणाले की, ठीक आहे चांगली गोष्ट आहे. देर है मगर अंधेर नही.
अन्नपुरवठा विभागाकडून शेतकऱ्यांना मदत करणार का यावर छगन भुजबळ म्हणाले की, जवळपास सरसकट करणार. नुसतं हिरवं दिसतंय, ज्याचे कंस आहे त्याला दाणे नाही. अनेक ठिकाणी दुबार पेरणी करण्याचे आता वेळ आली आहे. शेतकरी अडचणीमध्ये आहे हे खरंच आहे. आणखीन काही गावे यामध्ये वाढतील असं मला वाटतं. मुलांच्या परीक्षेमध्ये काही सूट देणार आहे. आणखीन दहा-बारा गोष्टी त्यामध्ये मदत करण्याचे ठरवले आहे. आणखीन काही रक्कम घ्यायची असेल तर त्या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन करू. एक तर अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना सुरू आहे. एकूण किती लोक यामध्ये आहे शेतकरी त्याला आपण किती जास्तीत जास्त पैसे देऊ शकतो. त्याचा अभ्यास करावा लागेल की नाही. दिवाळीच्या आत सर्व काम पूर्ण करू. जी काही मदत करायची ती करू.
ते पुढे म्हणाले की, काही गरीब माणस आहेत त्यांना आम्ही फुकट अन्न धान्य देतोच. त्याचा आम्ही सतत आढावा घेतोय. काही लोक प्राधान्य क्रमांकमध्ये येतात ते अन्नधान्य घेतात. परंतु सहा महिने ज्यांनी घेतलेलं नाही आहे. याचा अर्थात त्यांना गरज नाही. असे कार्ड आम्ही रद्द करतो. ज्यांना खरोखर गरज आहे प्राधान्य क्रमांकांमध्ये बसत आहेत. त्यांना मी ते वाटप करतो. परंतु कोरोना काळामध्ये सुद्धा प्रत्येक खेड्यामध्ये हजार लोकांना आपण गहू तांदूळ डबल दिला. कुठेही मागे पडलेलो नाही. एक सुद्धा गरजू व्यक्ती जो आहे. अन्नधान्य वाचून मागे राहणार नाही.
