AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs BAN : बांगलादेशचा टी20 मालिकेत ‘नागिन डान्स’, श्रीलंकेला 2-1 ने नमवलं

बांगलादेशने तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेला 8 गडी राखून पराभूत केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो तान्झिद हसन तमिम.. त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांना झोडून काढलं.

SL vs BAN : बांगलादेशचा टी20 मालिकेत 'नागिन डान्स', श्रीलंकेला 2-1 ने नमवलं
SL vs BAN : बांगलादेशचा टी20 मालिकेत 'नागिन डान्स', श्रीलंकेला 2-1 ने नमवलंImage Credit source: Bangladesh Cricket Twitter
| Updated on: Jul 16, 2025 | 10:22 PM
Share

बांगलादेशने श्रीलंकेला त्यांच्यात भूमीत टी20 मालिकेत 2-1 ने धूळ चारली आहे. तिसरा आणि निर्णायक टी20 सामना बांग्लादेश 8 गडी राखून जिंकला. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला होता आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण बांगलादेशने अचूक गोलंदाजीचं प्रदर्शन घडवलं आणि 20 षटकात 132 धावांवर रोखलं. श्रीलंकेच्या हातात विकेट होत्या पण मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. श्रीलंकेने विजयासाठी 138 धावांचं लक्ष्य ठेवलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तन्झिद हसन तमिम… त्याने 47 चेंडूत 6 षटकार आणि 1 चौकार मारत नाबाद 73 धावांची खेळी केली. तर लिटन दासने 32, तर तोहिद हृदोयने नाबाद 27 धावंची खेळी केली. बांगलादेशचा श्रीलंकेविरुद्धचा हा पहिलाच टी20 मालिका विजय आहे. या विजयानंतर बांगलादेशने काही नागिन डान्स केला नाही. पण बांगलादेशच्या खेळाडूंनी मागच्या काही स्पर्धांमध्ये विजयानंतर नागिन डान्स जल्लोष केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये यावरून आक्रमकता दिसून आली आहे.

श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका याने सांगितलं की, ‘माझा विचार होता की प्रथम फलंदाजी करावी आणि चांगला स्कोअर मिळवावा आणि त्याचे रक्षण करावे. आम्हाला प्रेमदासा स्टेडियमवर धावा रोखायला आवडते. पण मी खेळपट्टी चुकीची समजली. आम्ही विशेषतः पहिल्या हाफमध्ये आमच्या फलंदाजीने चांगले कामगिरी करू शकलो असतो. आम्हाला अधिक जबाबदारी घेण्याची गरज होती. सध्या, हे आमच्याकडे असलेले सर्वोत्तम संयोजन आहे आणि आम्हाला विश्वचषकापूर्वी सुधारणा करावी लागेल. हे निराशाजनक आहे पण हे कोणत्याही संघासोबत होऊ शकते परंतु आम्ही पुनरागमन करण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू.’

पण मेहदी हसनला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने 4 षटकात एक निर्धाव षटक टाकलं. तसेच 11 धावा देत 4 गडी बाद केले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेची धावगती मंदावली आणि त्याचा फायदा बांगलादेशला झाला. मेहदी हसन म्हणाला की, ‘मला श्रीलंकेतील खेळपट्टी माहित होती. गेल्या दोन सामन्यांमध्ये चेंडू फिरत होता म्हणून मी माझ्या लाईन्स आणि लेन्थवर टिकून राहिलो. नवीन चेंडूत थोडा फिरकी होती म्हणून मी तो चांगल्या क्षेत्रात उतरवण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने, मी यशस्वी झालो.’

तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने 7 विकेट आणि 6 चेंडू राखून जिंकला होता. त्यानंतर दुसर्‍या सामन्यात बांगलादेशने कमबॅक केलं आणि श्रीलंकेला 83 धावांनी पराभूत केलं. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णयाक होता. मात्र या सामन्यात श्रीलंकेला विजयश्री खेचून आणण्यात अपयश आलं.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.