AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs NZ : दोघांची शतकं, श्रीलंकेच्या 324 धावा, मात्र न्यूझीलंडसमोर 221 रन्सचं टार्गेट

Sri Lanka vs New Zealand 1st Odi : श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 324 धावा केल्या. मात्र आता न्यूझीलंडला 221 धावांचं आव्हान मिळालं आहे.

SL vs NZ : दोघांची शतकं, श्रीलंकेच्या 324 धावा, मात्र न्यूझीलंडसमोर 221 रन्सचं टार्गेट
kusal mendis and avishka fernando
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 13, 2024 | 9:31 PM
Share

अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडीस या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 49.2 ओव्हरमध्ये 324 धावा केल्या. मात्र त्यानंतरही न्यूझीलंडला विजयासाठी फक्त 221 धावांचं आव्हान मिळालं आहे. या सामन्यांचं आयोजन हे दांबुला येथे करण्यात आलं आहे. श्रीलंकेच्या डावातील शेवटचे 4 बॉल बाकी असताना पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. पावसामुळे 2 पेक्षा अधिक तासांचा वेळ वाया गेला. त्यामुळे न्यूझीलंडला डीएलएसनुसार 27 ओव्हरमध्ये 221 धावांचं सुधारित आव्हान मिळालं आहे.

श्रीलंकेची बॅटिंग

श्रीलंकेसाठी कुसल मेंडीस याने सर्वाधिक 143 धावा केल्या. तर अविष्का फर्नांडो शतकानंतर (100) बाद झाला. कुसलने 128 बॉलमध्ये 17 चौकार आणि 2 षटकारांसह 143 धावा केल्या. तर अविष्काने 115 बॉलमध्ये 9 फोर आणि 2 सिक्ससह 100 धावा पूर्ण केल्या. या दोघांच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे चौथं शतक ठरलं. या दोघांव्यतिरिक्त पाथुम निसांका याने 12, सदीरा समरविक्रमाने 5 आणि कॅप्टन चरिथ असलंका याने 40 धावांचं योगदान दिलं.

श्रीलंकेसाठी विक्रमी भागीदारी

दरम्यान कुसल मेंडीस आणि अविष्का फर्नांडो या जोडीने ऐतिहासिक आणि विक्रमी भागीदारी केली. या दोघांनी श्रीलंकेकडून कोणत्याही विकेटसाठी 206 धावांची सर्वोच्च भागीदारी केली. या दोघांनी यासह सनथ जयसूर्या आणि उपूल थरंगा या दोघांचा 18 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड उद्धवस्त केला. जयसूर्या आणि थरंगा या दोघांनी 2006 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नॅपियर येथे 201 धावांची भागीदारी केली होती.

न्यूझीलंडसमोर 221 धावांचं आव्हान, जिंकणार का?

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, महेश थेक्षाना, जेफ्री वांडरसे, दिलशान मदुशंका आणि असिथा फर्नांडो.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), टिम रॉबिन्सन, विल यंग, ​​हेन्री निकोल्स, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मिच हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, इश सोधी आणि जेकब डफी.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...