PAK vs SL: टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी श्रीलंकेला धक्का, दुसरा सामना फुकटात गेल्याने पाकिस्तानला फायदा

श्रीलंका पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यामुळे पाकिस्तानला फायदा झाला आहे. तर श्रीलंकेपुढे मालिका वाचवण्याचं आव्हान असणार आहे.

PAK vs SL: टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी श्रीलंकेला धक्का, दुसरा सामना फुकटात गेल्याने पाकिस्तानला फायदा
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी श्रीलंकेला धक्का, दुसरा सामना फुकटात गेल्याने पाकिस्तानला फायदा
Image Credit source: Sri Lanka Cricket Twitter
| Updated on: Jan 09, 2026 | 9:26 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात लिटमस टेस्ट सुरू आहे. दोन्ही संघात तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. ही मालिका टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला नशिबाची साथ मिळाली. कमबॅकसाठी आणि मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी श्रीलंकेला तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे. अन्यथा ही मालिका पाकिस्तानच्या खिशात जाईल. पाकिस्तानने श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत पहिल्या सामन्यात धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचे सर्व सामना श्रीलंकेत होणार आहेत. त्यामुळे ही मालिका पाकिस्तानसाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरणार आहे. दरम्यान, दुसरा टी20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे पाकिस्तानने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

श्रीलंका पाकिस्तान सामन्याच्या नाणेफेकीची वेळ ही संध्याकाळी 6.30 वाजताची होती. पण पावसाचा जोर कायम असल्याने नाणेफेकीचा कौल पुढे ढकलला. अर्धा तासाच्या अंतराने पावसाचा अंदाज घेतला गेला. पण पावसाचा जोर काही केल्या कमी झाला नाही. त्यामुळे पाच षटकांचा सामना खेळवणंही शक्य होणार नाही हे लक्षात आलं. अखेर 8.40 मिनिटांनी हा सामना रद्द केल्याचं घोषित केलं. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना आता 11 जानेवारीला होणार आहे. हा सामना श्रीलंकेसाठी करो या मरोची लढाई असणार आहे. इतकंच काय टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीचा आत्मविश्वास या मालिकेवर अवलंबून असणार आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

पाकिस्तान संघ: साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान आघा (कर्णधार), फखर जमान, उस्मान खान (विकेटकीपर), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, मोहम्मद वसीम जूनियर, सलमान मिर्झा, अबरार अहमद, नसीम शाह, ख्वाजा नाफे, उस्मान तारिक, अब्दुल समद.

श्रीलंकेचा संघ: पाथुम निसांका, कामिल मिश्रा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चरिथ असालंका, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दासुन शानाका (कर्णधार), दुष्मंथा चमीरा, महेश थेकशाना, नुवान थुशारा, एशान मलिंगा, त्रावेन मालिंगा, त्रावेन मलिंगा वेललागे, कामिंदू मेंडिस, कुसल परेरा.