AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

cricket gk : महिला क्रिकेटपटूंची बॅट पुरुषांच्या बॅटपेक्षा लहान असते? इतर साहित्यात काय असतो बदल?

महिला क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धेपैकी एक असलेल्या WPL 2026 ला 9 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.महिला क्रिकेट पुरुषांच्या क्रिकेटपेक्षा वेगळे असते का ? नियमांत काय असतो बदल, दोन्हींमध्ये काय असतो फरक हे जाणून घेऊयात....

| Updated on: Jan 11, 2026 | 12:12 AM
Share
महिला क्रिकेटपटूंच्या बॅट पुरुष क्रिकेटपटूंच्या बॅटपेक्षा थोड्या आकाराने लहान आणि वजनाने थोड्या  हलक्या असतात.इतके नव्हे तर इतर क्रीडा साहित्यातही थोडा फरक असतो. महिला क्रिकेटमध्ये वापरला जाणारा चेंडू देखील पुरुष क्रिकेटर पेक्षा  वेगळा असतो. काय आहेत  बदल नेमके ते जाणून घेऊया.

1 / 5
जगातील सर्वात मोठ्या महिला क्रिकेट स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या, WPL 2026 मध्ये जगभरातील अनेक नामांकित महिला क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत.  या हंगामात एकूण 28 दिवसांत 22 सामने खेळले जाणार आहेत.मात्र, महिला क्रिकेटचे नियम हे पुरुषांच्या क्रिकेटपेक्षा वेगळे आहे का ? यासोबतच,  महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंच्या बॅटमध्ये काय असतो फरक हे पाहूयात...

2 / 5
 महिला आणि पुरुष क्रिकेटमधील सर्वात मोठा बदल म्हणजे चेंडूचे वजन. महिला क्रिकेटमध्ये वापरला जाणारा चेंडू पुरुषांच्या क्रिकेटपेक्षा थोडा हलका असतो. साधारणपणे, महिला क्रिकेट  स्पर्धांमध्ये १४० ते १५१ ग्रॅम वजनाचा चेंडू वापरला जातो, तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये १५५ ते १६५ ग्रॅम वजनाचा चेंडू वापरला जातो. मात्र, दोन्ही चेंडूचा आकार सारखाच असतो. महिलांची शक्ती आणि गोलंदाजीचा वेग लक्षात घेऊन, चेंडू हलका थोडा केला जातो, ज्यामुळे त्यांना  चेंडूला अधिक स्विंग आणि हालचाल देता येईल.

3 / 5
महिला क्रिकेट स्पर्धांमध्ये मैदानाचा आतील सर्कल पुरुष क्रिकेटपेक्षा थोडे लहान असते. आयसीसीच्या नियमांनुसार, महिला क्रिकेटमध्ये अंतर्गत वर्तुळाची त्रिज्या २३ मीटर असते, तर पुरुष क्रिकेटमध्ये ती २७.४३ मीटर इतकी ठेवली जाते.महिलांची ताकद पाहून हा वर्तुळाचा  आकार कमी करण्यात आला आहे. मैदानातील अंतर्गत वर्तुळ थोडे असल्याने महिला क्रिकेटपटूंना पॉवरप्ले दरम्यान अधिक आक्रमक शॉट्स खेळण्याची संधी मिळते.

4 / 5
महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंच्या बॅटमध्येही फरक आहे. पुरुष क्रिकेटपटूंच्या बॅटचे वजन साधारणपणे ११३४ ग्रॅम ते १३६० ग्रॅम दरम्यान असते. तर महिला क्रिकेटपटूंच्या बॅटचे वजन थोडे हलके असते, १०४९ ग्रॅम ते ११९० ग्रॅमपर्यंत ठेवलेले असते. महिलांची सरासरी ताकद लक्षात घेऊन बॅट हलक्या बनवलेल्या असतात.

5 / 5
बाळासाहेबांवरून फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपली!
बाळासाहेबांवरून फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपली!.
गौतमी पाटील चंद्रपुरात प्रचाराला, वडेट्टीवार आणि मुनगंटीवारांत जुंपली
गौतमी पाटील चंद्रपुरात प्रचाराला, वडेट्टीवार आणि मुनगंटीवारांत जुंपली.
फडणवीस आमचे शत्रू नाहीत, ते...; संजय राऊतांचं मोठं विधान
फडणवीस आमचे शत्रू नाहीत, ते...; संजय राऊतांचं मोठं विधान.
तुषार आपटे प्रकरण : टीकेनंतर भाजपची माघार? काय म्हणाले राऊत | VIDEO
तुषार आपटे प्रकरण : टीकेनंतर भाजपची माघार? काय म्हणाले राऊत | VIDEO.
अत्याचाराचा आरोप असलेल्यांना स्वीकृत नगरसेवक करता? राऊतांचा हल्ला
अत्याचाराचा आरोप असलेल्यांना स्वीकृत नगरसेवक करता? राऊतांचा हल्ला.
मोफत मेट्रो-बस योजना विचारपूर्वक केलीये! अजितदादांचं स्पष्टीकरण
मोफत मेट्रो-बस योजना विचारपूर्वक केलीये! अजितदादांचं स्पष्टीकरण.
ठाण्यात शिंदेच्या उमेदवाराच्या वडिलांची गुंडगिरी! व्हिडीओ आला समोर
ठाण्यात शिंदेच्या उमेदवाराच्या वडिलांची गुंडगिरी! व्हिडीओ आला समोर.
ठाकरे बंधूंची मुंबईत पहिली संयुक्त जाहीर सभा
ठाकरे बंधूंची मुंबईत पहिली संयुक्त जाहीर सभा.
प्रचारांचा 'सुपर संडे' निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका
प्रचारांचा 'सुपर संडे' निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका.
बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा
बदलापूर सहआरोपी तुषार आपटे भाजपचा स्वीकृत नगरसेवक; संतापानंतर राजीनामा.