
मुंबई | 16 जुलै : पाकिस्तान संघाचा हुकमी एक्का असलेल्या शाहिनशाह आफ्रिदीने दुखापतीनंतर दमदार कमबॅक केलं आहे. एक वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात उतरणाऱ्या आफ्रिदीने आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये विकेट घेत इतिहास रचला आहे. नवा चेंडू स्विंग करण्यासाठी आफ्रिदी ओळखला जातो. अशातच आता सुरू असलेल्याा श्रीलंका आणि पाकिस्तान पहिल्या कसोटी सामन्यामध्ये आफ्रिदीने श्रीलंकेला पहिला धक्का देत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
पहिल्या कसोटीमध्ये श्रीलंका संघ फलंदाजीला उतरला आहे. सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये शाहिन आफ्रिदीने सलामीवीर निशान मदुष्काला आऊट करत पहिला धक्का दिला. अवघ्या 4 धावा काढून निशानला माघारी परतावं लागलं. या विकेटसह शाहिनशाह आफ्रिदीने कसोटी क्रिकेटमधील आपल्या 100 विकेट पूर्ण केल्या. पाकिस्तानसाठी कसोटीमध्ये 100 विकेटस घेणारा तो 19 वा गोलंदाज ठरला आहे.
आफ्रिदीने ऑक्टोबरमध्ये गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पुनरागमन केलं होतं. मात्र फायनल सामन्याआधी गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. यामुळे आफ्रिदीला इंग्लंड आणि न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेमधून बाहेर पडला होता.
दरम्यान, श्रीलंका आणि पाकिस्तानमधील कसोटी सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. आतापर्यंत 226-5 धावसंख्या झाली असून धनंजया डी सिल्वा नाबाद 64 आणि सदीरा समरविक्रमा नाबाद 25 धावांवर खेळत आहे. पाकिसान संघाकडून शाहिन आफ्रिदी सर्वाधिक 3 विकेट्स तर नसीम शाह आणि अबरार अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): दिमुथ करुणारत्ने (C), निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, दिनेश चंडिमल, सदीरा समरविक्रमा (W), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, विश्व फर्नांडो, कसून रजिथा
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद, बाबर आझम (C), सौद शकील, सर्फराज अहमद (W), आगा सलमान, नौमान अली, अबरार अहमद, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह