Vaibhav Suryavanshi कडून अर्जून तेंडुलकर याचीही धुलाई, 14 वर्षांच्या फलंदाजाची स्फोटक बॅटिंग

Vaibhav Suryavanshi vs Arjun Tendulkar : अर्जून तेंडुलकर याने बिहारच्या वैभव सूर्यवंशी याच्यासमोर 10 चेंडू टाकले. वैभवने अर्जूनसमोर या 10 बॉलमध्ये किती रन्स केल्या? जाणून घ्या.

Vaibhav Suryavanshi कडून अर्जून तेंडुलकर याचीही धुलाई, 14 वर्षांच्या फलंदाजाची स्फोटक बॅटिंग
Vaibhav Suryavanshi vs Arjun Tendulkar SMAT
Image Credit source: PTI
Updated on: Dec 04, 2025 | 7:50 PM

अंडर 19 टीम इंडियाचा स्टार बॅट्समन वैभव सूर्यवंशी सातत्याने विविध स्पर्धेत खोऱ्याने धावा करत आहे. वैभव सध्या सय्य्द मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत बिहारचं प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेतील बिहार विरुद्ध गोवा सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं खास लक्ष लागून होतं. वैभव सूर्यवंशी आणि अर्जून तेंडुलकर एकमेकांसमोर कशी कामगिरी करतात? हे क्रिकेट चाहत्यांना पाहायचं होतं. अर्जून आपल्या धारदार बॉलिंगने कमाल करणार की वैभव बॅटिंगने चोप देणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा होती. मात्र वैभवने अर्जूनसह गोव्याच्या इतर गोलंदाजांची धुलाई केली.

वैभव सूर्यवंशी विरुद्ध अर्जून तेंडुलकर

वैभवला गोवा विरुद्ध एकूण 4 गोलंदाजांचा सामना करावा लागला. वैभवने अर्जूनची धुलाई केली. अर्जून या सामन्यात वैभववर सर्वाधिक धावा लुटवणारा दुसरा गोलंदाज ठरला. वैभव आणि अर्जून यांच्यात एकूण 10 बॉलचा सामना झाला. वैभवने या 10 चेंडूत 150 च्या स्ट्राईक रेटने 15 धावा केल्या. वैभवने अर्जूनच्या बॉलिंगवर 3 फोर लगावले. तसेच 1 दुहेरी आणि 1 एकेरी धावही घेतली.

दीपराज गांवकर यांची धुलाई

वैभवने अर्जुनपेक्षा दीपक गांवकर याची सर्वाधिक धुलाई केली. दीपकने वैभवला एकूण 5 बॉल टाकले. वैभवने या 5 बॉलमध्ये 300 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने 16 रन्स केल्या. वैभवने दीपकच्या बॉलिंगवर 2 खणखणीत षटकार लगावले. तसेच 1 चौकार ठोकला. मात्र त्यानंतर दीपकनेच वैभवला आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

वैभवची वादळी खेळी

वैभवने गोवा विरुद्ध 25 बॉलमध्ये 46 धावा केल्या. वैभवने 184 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. वैभवने या खेळीत 46 पैकी 40 धावा एका जागेवर उभं राहून केल्या. वैभवने या खेळीत 4 षटकार आणि तितकेच चौकार लगावले. वैभवने गोवा विरूद्धच्या खेळीसह या स्पर्धेत एकूण 186 धावा केल्या आहेत. वैभवने एकूण 14 षटकार लगावले आहेत.

वैभवचा पावरप्लेमध्ये तडाखा

वैभव सूर्यवंशी याने या सामन्यात बिहारला तडाखेदार सुरुवात मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. मात्र वैभव अर्धशतकापर्यंत पोहचण्यात अपयशी ठरला.  वैभवचं या सामन्यातील अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. मात्र वैभवने फटकेबाजी करत बिहारला आक्रमक अशी सुरुवात करुन दिली. वैभवच्या फटकेबाजीमुळे बिहारला या सामन्यनात 59 धावा करता आल्या. वैभव पावरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये आऊट झाला.