Virat Kohli: चिडलेले गांगुली विराटला कारणे दाखवा नोटीस पाठवणार होते, नवीन धक्कादायक खुलासा

बीसीसीआयच्या निवड समितीने संघ जाहीर करण्याच्या तासभर आधी आपल्याला वनडे कॅप्टनशिपवरुन हटवल्याचा निर्णय कळवलां, असं विराट म्हणाला.

Virat Kohli: चिडलेले गांगुली विराटला कारणे दाखवा नोटीस पाठवणार होते, नवीन धक्कादायक खुलासा
Twitter
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 4:53 PM

मुंबई: मागच्या आठवड्यात विराट कोहलीने (Virat Kohli) तडकाफडकी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून भारतीय क्रिकेटमध्ये सर्वकाही आलबेल आहे का? अशी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. विराटने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले, तेव्हापासून या सर्व वादाची सुरुवात झाली. विराटला वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी (Test Captainship) कायम रहायचे होते. पण बीसीसीआयला मर्यादीत षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार नको होते. त्यामुळे विराटला वनडेच्या कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं.

विराटने टी-20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी, विराटला कर्णधारपद सोडू नको असं आम्ही सांगितलं होतं, असं एका मुलाखतीत म्हटलं. विराटने त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्याशी बीसीसीआयकडून असा कुठलाही संवाद साधण्यात आला नाही. कर्णधारपद सोडू नकोस, असं कोणी म्हटलं नाही, असा दावा केला.

सौरव गांगुलीवर निर्माण झालं होतं प्रश्नचिन्ह बीसीसीआयच्या निवड समितीने संघ जाहीर करण्याच्या तासभर आधी आपल्याला वनडे कॅप्टनशिपवरुन हटवल्याचा निर्णय कळवलां, असं विराट म्हणाला. त्याच्या या विधानांमुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलेल्या विधानांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या सर्व प्रकारामुळे सौरव गांगुली इतके संतापले होते की, ते विराट कोहलीला कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या तयारीमध्ये होते. इंडिया अहेड न्यूजने हे वृत्त दिलं आहे.

बोर्डाच्या सदस्यांनी सौरवला रोखलं भारतीय क्रिकेटच्या इतिहासात जे झालं नाही, ते पाऊल सौरव गांगुली उचलणार होते. पण वाद आणखी वाढला असता, म्हणून बीसीसीआय सदस्यांनी सौरव गांगुलीला रोखलं. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेआधी कर्णधाराला कारणेदाखवा नोटीस पाठवणं बीसीसीआय सदस्यांना योग्य वाटलं नाही. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

Sourav Ganguly wanted to issue show cause notice to Virat Kohli after his press conference outburst

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.