T 20 World Cup 2024: दक्षिण आफ्रिकेची कुरघोडी, बांगलादेश विरुद्ध विजयाने टीम इंडियाला फटका
Indian Cricket Team: दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर विजय मिळवला. मात्र त्याचा फटका टीम इंडियाला बसला आहे. जाणून घ्या नक्की काय झालं?

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा थरार दिवसेंदिवस रंगताना दिसतोय. साखळी फेरीतील अर्धा टप्पा संपायला आल्यानंतर आता सुपर 8 ची स्पर्धा चांगलीच चुरशीची झाली आहे. अशात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा एक महारेकॉर्ड अवघ्या 24 तासांमध्ये उध्वस्त केला आहे. दक्षिण आफ्रिकेने हा रेकॉर्ड बांगलादेशला पराभूत करत आपल्या नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाच्या नावावर असलेला असा कोणता विक्रम आपल्या नावावर केलाय, हे आपण जाणून घेऊयात.
दक्षिण आफ्रिकेने थरारक झालेल्या सामन्यात बांगलादेशवर 4 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने पहिले बॅटिंग करत 113 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेलने बांगलादेशला 109 धावांवर रोखलं. टी 20 वर्ल्ड कप इतिहासातील 109 ही सर्वात निच्चांकी धावसंख्या होती. मात्र त्यानंतरही दक्षिण आफ्रिकेने या धावांचा यशस्वी बचाव केला.
त्याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता श्रीलंकेने 2014 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध 119 धावांचा बचाव केला होता. श्रीलंकेने तेव्हा न्यूझीलंडला 60 धावांवरच रोखलं होतं. टीम इंडियाने श्रीलंकेच्या या 10 वर्षांआधीच्या विक्रमाची बरोबरी रविवारी 9 जून रोजी पाकिस्तानला पराभूत करत केली. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानला टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 113 धावांपर्यंतच पोहचता आलं.
दक्षिण आफ्रिकेकडून निच्चांकी धावसंख्येचा बचाव
RECORD ALERT 🚨
South Africa defend the lowest total in T20 World Cup history – 113!
Captain Aiden Markram 👏#SAvsBAN pic.twitter.com/Rn6GI3690F
— Cricket.com (@weRcricket) June 10, 2024
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन: नजमुल हौसेन शांतो (कॅप्टन), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), तौहीद ह्रदोय, शकीब अल हसन, जाकेर अली, महमुदुल्ला, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया आणि ओटनील बार्टमन.