AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs SA | दक्षिण आफ्रिकाला रोखणं अशक्यच, न्यूझीलंडसमोर 358 धावांचं आव्हान

New Zealand vs South Africa | दक्षिण आफ्रिका टीमच्या फलंदाजांनी या वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आपली परंपरा कायम राखत न्यूझीलंड विरुद्धही नेहमीप्रमाणे 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

NZ vs SA | दक्षिण आफ्रिकाला रोखणं अशक्यच, न्यूझीलंडसमोर 358 धावांचं आव्हान
| Updated on: Nov 01, 2023 | 6:26 PM
Share

पुणे | दक्षिण आफ्रिका टीमला रोखणं अशक्य आहे, हे पुन्हा त्यांच्या खेळाडूंनी सिद्ध करुन दाखवलंय. दक्षिण आफ्रिका टीमने क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन या जोडीने केलेल्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडला विजयासाठी 358 धावांचं आव्हान दिलं आहे. दक्षिण आफ्रिकाने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 357 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकाकडून रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याने सर्वाधिक 133 धावा केल्या. तर क्विंटन डी कॉक याने 114 धावांची खेळी केली. क्विंटन डी कॉक याचं वर्ल्ड कप 2023 मधील हे चौथं शतक ठरलं. तसेच दक्षिण आफ्रिकाची पहिले बॅटिंग करताना 300 पेक्षा अधिक धावा करण्याची ही सलग आठवी वेळ ठरली आहे.

दक्षिण आफ्रिका टीमची बॅटिंग

न्यूझीलंडने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. क्विंटन डी कॉक आणि टेम्बा बावूमा या सलामी जोडीने 38 धावांची भागीदारी केली. बावुमा 24 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर कॉक आणि ड्युसेन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. या दरम्यान क्विंटन डी कॉक याने शतक पूर्ण केलं. मात्र कॉक शतकानंतर फार वेळ मैदानात टिकू शकला नाही. कॉकने 116 बॉलमध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 114 धावा केल्या.

डी कॉकनंतर ड्युसेन याने जबाबदारी सांभाळली. ड्युसेन यानेही शतक पूर्ण केलं. ड्युसेन याने डेव्हिड मिलर या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 46 बॉलमध्ये 78 धावांची भागीदारी केली. ड्युसेनने 118 बॉलमध्ये 9 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 133 धावा केल्या. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन या दोघांनी 16 बॉलमध्ये 35 धावा जोडल्या. डेव्हिड मिलर याने अखेरच्या क्षणी जोरदार फटकेबाजी करत 30 बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली.

तर शेवटच्या बॉलवर एडन मारक्रम याने सिक्स ठोकला. तर क्लासेन याने नाबाद 15 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊथी याने 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट आणि जेम्स निशाम या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, टीम साउथी आणि ट्रेंट बोल्ट.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....