AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : T20 च्या एका मॅचमध्ये 517 रन्स, 35 सिक्स, गोलंदाजांच काय झालं असेल? एकदा व्हिडिओ बघा

SA vs WI T20 : एकूण 13 गोलंदाजांनी बॉलिंग केली. वेस्ट इंडिजने या मॅचमध्ये सिक्सचा रेकॉर्ड केला. टी 20 इंटरनॅशनल मॅचमधील हा एक रेकॉर्ड आहे. या मॅचमध्ये एकूण 81 फोर-सिक्स मारण्यात आले. याआधी 515 धावांचा रेकॉर्ड आहे.

Video : T20 च्या एका मॅचमध्ये 517 रन्स, 35 सिक्स, गोलंदाजांच काय झालं असेल? एकदा व्हिडिओ बघा
quinton de cock Image Credit source: AFP
| Updated on: Mar 27, 2023 | 3:56 PM
Share

SA vs WI T20 : T20 क्रिकेटमध्ये अनेकदा गोलंदाजांची धुलाई होते. सेंच्युरियनच्या स्टेडियममध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका सामन्यात जे घडलं, त्यात गोलंदाजांचा पार पालापाचोळा झाला. दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजने पहिली बॅटिंग करताना 258 धावा ठोकल्या. खरंतर वेस्ट इंडिजने टी 20 मॅचमध्ये धावांचा डोंगर उभारला होता. वेस्ट इंडिज हरेल, असा विचारही कोणी केला नव्हता. पण असं घडलं.

दक्षिण आफ्रिकेच्या टीमने फक्त 4 विकेट गमावून 7 चेंडूआधीच विजयी लक्ष्य गाठलं. गोलंदाजांची कशी धुलाई झाली, ते जाणून घ्या.

एकूण 13 गोलंदाजांनी बॉलिंग केली

सेंच्युरियनच्या टी 20 मॅचमध्ये एकूण 13 गोलंदाजांनी बॉलिंग केली. यात 12 बॉलर्सचा इकॉनमी रेट प्रतिओव्हर 10 पेक्षा जास्त होता. फक्त कागिसो रबाडा असा एकमेव गोलंदाज होता, ज्याचा इकॉनमी रेट प्रतिओव्हर 10 पेक्षा कमी होता. मार्को जॅनसेन आणि मगालाने आपल्या 4 ओव्हरच्या कोट्यात 50 पेक्षा जास्त धावा दिल्या. या मॅचमध्ये अनेक आश्चर्यकारक आकडे पहायला मिळाले.

याआधी 515 धावांचा रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या टीमने मिळून या मॅचमध्ये 517 धावांचा पाऊस पाडला. हा पहिला असा टी 20 सामना आहे, जिथे दोन्ही टीम्सनी मिळून 500 चा आकडा गाठला. याआधी 515 धावांचा रेकॉर्ड मुल्तान सुल्तांस और क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या नावावर होता. पण ती पीएसएलची मॅच होती. 81 फोर-सिक्स

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील या मॅचमध्ये एकूण 35 सिक्स मारण्यात आले. टी 20 इंटरनॅशनल मॅचमधील हा एक रेकॉर्ड आहे. या मॅचमध्ये एकूण 81 फोर-सिक्स मारण्यात आले.

15 चेंडूत अर्धशतक

वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्सने 46 चेंडूत 118 धावा फटकावल्या. पण त्याच्या या खेळीवर क्विंटन डि कॉकच शतक भारी पडलं. क्विंटन डिकॉक आणि त्याचा ओपनिंग जोडीदार रीजा हॅड्रीक्सने दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. डिकॉकने 44 चेंडूत 100 धावा फटकावल्या. यात 9 चौकार आणि 8 षटकार होते. डिकॉकने या मॅचमध्ये अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

पावरप्लेमध्ये 102 रन्स

वेस्ट इंडिजने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना दमदार सुरुवातीची गरज होती. डिकॉक आणि हेड्रिक्सने मिळून तशी सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 152 धावा जोडल्या. त्यांनी पावरप्लेमध्ये 102 धावा ठोकल्या. टी 20 इंटरनॅशनमलध्ये पावरप्लेमध्ये कुठल्याही टीमने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. वेस्ट इंडिजकडून सिक्सचा रेकॉर्ड

वेस्ट इंडिजने या मॅचमध्ये एकूण 22 सिक्स मारले. टी 20 इंटरनॅशनलच्या एका मॅचमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्या रेकॉर्डची त्यांनी बरोबरी केली.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!