SA vs WI Test : कॅचने फिरवली मॅच, धडाधड दक्षिण आफ्रिकेचे 7 विकेट, VIDEO

SA vs WI Test : वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात डीन एल्गरच्या रुपात दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका बसला. ब्लॅकवुडने त्याची शानदार कॅच पकडली. त्यानंतर मॅचची दिशाच पलटली.

SA vs WI Test : कॅचने फिरवली मॅच, धडाधड दक्षिण आफ्रिकेचे 7 विकेट, VIDEO
Sa vs wiImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 10:07 AM

SA vs WI Test : क्रिकेटच्या मैदानात एक कॅच संपूर्ण मॅचची दशा आणि दिशा बदलू शकते. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात हे पहायला मिळालं. सेंच्युरियनमध्ये दोन्ही टीम्समध्ये पहिला कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. यजमान दक्षिण आफ्रिकेने धमाकेदार सुरुवात केली. डीन एल्गर आणि एडन मारक्रमच्या जोडीने ओपनिंग पार्टनरशिप केली. सामना पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या ताब्यात होता. पण त्यानंतर एका कॅचने मॅच फिरली.

दक्षिण आफ्रिकेच्या टीमच्या एकही विकेट न गमावता 141 धावा झाल्या होत्या. डीन एल्गर 71 धावांवर खेळत होता. एडन मारक्रम दुसऱ्या टोकाला फलंदाजी करत होता. तो 60 धावांवर नाबाद होता. याच दरम्यान अल्जारी जोसेफ ओव्हर टाकण्यासाठी आला. त्याने ही जोडी फोडली.

व्हॉट ए कॅच

अल्जारी जोसेफच्या ओव्हरमध्ये डीन एल्गरने हवेत शॉट खेळला. ही कॅच पकडणं सोपं नव्हतं. पण मॅचची दिशा बदलण्यासाठी ही कॅच आवश्यक होती. वेस्ट इंडिजचा फिल्डप ब्लॅकवुडने हे अवघड काम केलं.

View this post on Instagram

A post shared by FanCode (@fancode)

त्याने मागच्या दिशेने हवेत झेप घेत ही शानदार कॅच पकडली. एल्गरची विकेट जाताच 141 धावांची पार्टनरशिप मोडली. डीन एल्गर 71 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. टेस्टच्या पहिल्या इनिंगमधील दक्षिण आफ्रिकेची ही पहिली विकेट होती. दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला

ब्लॅकवुडच्या कॅचनंतर वेस्ट इंडिजच्या टीमने मॅचमध्ये पुनरागमन केलं. ओपनिंग विकेटसाठी शतकी भागीदारी झाली.दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी झाली. ही जोडी फुटल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे 6 फलंदाज 100 धावा सुद्धा धावफलकावर लावू शकले नाहीत. परिणामी दिवसाचा खेळ संपताना एकवेळ दक्षिण आफ्रिकेची स्थिती 2 बाद 221 वरुन 8 बाद 314 झाली..

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.