AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs ZIM : टेस्ट चॅम्पियनशिपनंतर दक्षिण अफ्रिकेला सामना जिंकूनही एकही गुण मिळणार नाही; कारण

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात कसोटी सामना पार पडला. पण त्याचा दक्षिण अफ्रिकेला काही एक फायदा झाला नाही.

SA vs ZIM : टेस्ट चॅम्पियनशिपनंतर दक्षिण अफ्रिकेला सामना जिंकूनही एकही गुण मिळणार नाही; कारण
दक्षिण अफ्रिका संघ विजयीImage Credit source: South Africa Cricket Twitter
| Updated on: Jul 01, 2025 | 5:19 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अर्थात चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड, वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका-बांग्लादेश कसोटी सामने पार पडले. या सामन्यानंतर गुणतालिकेत वर खाली होताना दिसत आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेचं चित्र बदलताना दिसत आहे. चौथं पर्व सुरु असताना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात कसोटी सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने झिम्बाब्वेला नमवलं. पण त्यांना गुणातालिकेत काहीच फायदा झाला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणातलिकेत त्यांना शून्य अंकांसह कायम राहावं लागलं आहे. कारण असं की, झिम्बाब्वे हा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग नाही. त्यामुळे या सामन्याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर काही एक फरक पडला नाही. एकूण नऊ संघ या स्पर्धेत खेळत आहे. यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, बांग्लादेश, भारत, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघाचा भाग आहे. हे संघ जेव्हा एकमेकांशी खेळतील तेव्हाच गुणतालिकेवर फरक पडेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या गुणातालिकेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे या दोन्ही संघांची विजयी टक्केवारी ही 100 आहे. तर श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची मालिका 1-0 ने सुटली. ही मालिका श्रीलंकेने खिशात घातली. त्यामुळे श्रीलंका तिसर्‍या क्रमांकावर असून विजयी टक्केवारी 66.67 टक्के आहे. तर बांगलादेशची विजयी टक्केवारी ही 16.67 टक्के आहे. तर भारताने पहिलाच सामना गमवल्याने विजयी टक्केवारी शून्य आहे.

दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण अफ्रिकेने 9 गडी गमवून 418 धावा केल्या आणि डाव घोषित केला. या धावांचा पाठला करताना झिम्बाब्वेचा संघ 251 धावांवर सर्व बाद झाला. दक्षिण अफ्रिकेकडे पहिल्या डावात 167 धावांची आघाडी होती. या धावांच्या पुढे खेळताना दक्षिण अफ्रिकेने 369 धावा केल्या. यासह आघाडी आणि दुसऱ्या डावात केल्या धावांची बेरीज करून 536 धावा केल्या. तसेच विजयासाठी 537 धावांचं आव्हान दिलं. मात्र हे आव्हान गाठताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 208 धावांवर गारद झाला आणि दक्षिण अफ्रिकेने हा 328 धावांनी सामना जिंकला.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ