माजी दिग्गज क्रिकेटपटूचे BCCI वर आरोप, ‘या’ लीगमध्ये खेळल्यास भारतीय क्रिकेटशी संबध तोडावा लागण्याची धमकी

तब्बल 361 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या या खेळाडूने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड केले आहेत. आता त्याने केलेल्या या आरोपानंतर तो पुन्हा चर्चेत आला आहे.

माजी दिग्गज क्रिकेटपटूचे BCCI वर आरोप, या लीगमध्ये खेळल्यास भारतीय क्रिकेटशी संबध तोडावा लागण्याची धमकी
BCCI
| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 4:28 PM

मुंबई : दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाचा माजी क्रिकेटपटू हर्शल गिब्स (Herschelle Gibbs) याने BCCI वर त्याला धमकी देत असल्याचा आरोप केला आहे. त्याने म्हटलंय भारतीय क्रिकेट बोर्ड त्याला काश्मीर प्रीमियर लीगमध्ये खेळण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रशीद लतीफने देखील BCCI वर असेच काहीसे आरोप केले होते. त्यांच्या मते BCCI जे माजी क्रिकेटपटू KPL मध्ये सहभाग घेतील त्यांना भारतीय क्रिकेटमधील कोणत्याच कार्यक्रमात सहभाग घेता येणार नाही.

लतीफनंतर आता गिब्सने देखील BCCI वर ट्विटद्वारे आरोप केले आहेत. त्याने लिहिलं आहे, BCCI पाकिस्तानशी भारताच्या बिघडलेल्या राजनीतिक समीकरणांमुळे मला KPL मध्ये खेळण्याची परवानगी दिली जात नाही. तसेच मी असे केल्यास मला भारतातील कोणत्याही क्रिकेट संबंधी कार्यक्रमात, स्पर्धांत सहभाग घेता येणार नाही. अशी धमकीही दिली जात आहे. सध्या KPL साठी हर्शल गिब्स, मोंटी पानेसर, तिलकरत्ने दिलशान या खेळांडूंची निवड झाली आहे.

6 संघामध्ये होणार KPL

काश्मीर प्रीमियर लीगमध्ये 6 संघ खेळमार आहेत. ओवरसीजन वॉरियर्स, मुजफ्फराबाद टायगर्स, रावलकोट हाक्स, बाघ स्टालियंस, मीरपुर रॉयल्स आणि कोटली लायन्स अशी या संघाची नावं आहेत. इमाद वसीम, मोहम्मद हफीज, शाहिद आफ्रिदी, शादाब खान, शोएब मलिक आणि कामरान अकमल हे या संघाचे कर्णधार आहेत.

इतर बातम्या

IND vs SL 3rd T20 Live : श्रीलंकेचा भारतावर दणदणीत विजय, टीम इंडियानं टी-20 मालिका गमावली

विराट, रोहितनंतर ‘हा’ फलंदाजही तिन्ही क्रिकेट प्रकारातील ‘कम्प्लीट पॅकेज’, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

(South African Cricketer herschelle gibbs claims bcci threatening him over kashmir premier league)