VIDEO: आयपीएल स्पर्धेत लखनौ दिल्ली सामन्यादरम्यान जोरदार राडा, स्टेडियममध्येच हाणामारी

आयपीएल 2026 स्पर्धेतील पाचवा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. पण एका बाजूला सामन्याची रंगत सुरू असताना दुसरीकडे जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

VIDEO: आयपीएल स्पर्धेत लखनौ दिल्ली सामन्यादरम्यान जोरदार राडा, स्टेडियममध्येच हाणामारी
VIDEO: आयपीएल स्पर्धेत लखनौ दिल्ली सामन्यादरम्यान जोरदार राडा, स्टेडियममध्येच हाणामारी
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 02, 2026 | 4:14 PM

आयपीएल स्पर्धेतील पाचव्या सामन्यात क्रीडाप्रेमींची निराशा झाली. कारण आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात कमी धावसंख्येची नोंद झाली. चौकार षटकारांची आतषबाजी होईल असं चाहत्यांना वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. लखनौ सुपर जायंट्सचा संघ 18.4 षटकात 141 धावा करून सर्वबाद झाला. तर हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 17.1 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने 6 गडी राखून जिंकला. एकीकडे हा सामना सुरू होता आणि दुसरीकडे स्टेडियममध्ये एक भलतंच चित्र पाहायला मिळाला. या सामनादरम्यान क्रीडाप्रेमी मैदानातच भिडल्याचं पाहायला मिळालं. सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं दुहेरी मनोरंजन झालं असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही. लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये घडलेला हा प्रकार काही रीलसाठी नाही तर खराखुरा होता.

नेमकं काय घडलं?

लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यादरम्यान झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात दोन मुलं मारमारी करताना दिसत आहेत. दोघंही उपस्थित प्रेक्षकांचं काही ऐकत नव्हते. तसेच मारहाण करत सुटले होते. एकाने दुसऱ्या मुलाला ठोसे मारतच खाली पाडलं. तर खाली पडलेला मुलगाही जोरदार प्रहार करत होता.. यावेळी सुरक्षारक्षक आणि मैदानातील प्रेक्षकांनी त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यानाही हे दोघेही जण ऐकत नव्हते. अखेर काही वेळात हे भांडण सोडवण्यात त्यांना यश आलं. दोघांना एकमेकांपासून लांब नेलं गेलं. व्हायरल व्हिडीओनुसार, 23 सेकंद या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

सामन्यानंतर काय म्हणाला ऋषभ पंत?

लखनौ सुपर जायंट्सची सुरूवात पराभवाने झाली. खरं या स्पर्धेत जेतेपदासाठी कोणीही लखनौ सुपर जायंट्सला पसंती दिलेली नाही. त्यात सुरवात पराभवाने झाल्याने क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत. पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, रनआऊटबद्दल मला वाटतं की, त्यातून सावरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दुर्लक्ष करणे. मला वाटतं, भविष्याचा विचार करता हाच सर्वोत्तम मार्ग आहे, कारण तुम्हाला माहीत आहे की अशा गोष्टी तुमच्या नियंत्रणात नसतात, पण त्याबद्दल विचार केल्याने तुम्ही नक्कीच बॅकफूटवर जाता.

Follow Us