PAK A vs SL A: नऊ विकेट्स पडल्या, तरी श्रीलंका हरला नाही! शेवटच्या जोडीनं पाकिस्तानला रडवलं, आशिया कपवर नाव कोरलं

Asia Cup Rising Stars Final: श्रीलंका 'अ' संघाने आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 चे विजेतेपद पटकावले आहे. पाकिस्तान 'अ' संघाला 1 गडी राखून पराभूत केले आहे.

PAK A vs SL A: नऊ विकेट्स पडल्या, तरी श्रीलंका हरला नाही! शेवटच्या जोडीनं पाकिस्तानला रडवलं, आशिया कपवर नाव कोरलं
Sri Lanka A Snatch Victory from Pakistan A
| Updated on: Nov 29, 2026 | 11:32 PM

एसीसी मेन्स एशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या अंतिम सामन्यात श्रीलंका ‘अ’ संघाने पाकिस्तान ‘अ’ संघाला 1 गडी राखून रोमांचकरीत्या पराभूत करून विजेतेपद पटकावले. 217 धावांचे लक्ष्य गाठताना श्रीलंकेची अवस्था एके वेळी 198 धावांवर 9 गडी अशी होती आणि विजयाच्या आशा धूसर झाल्या होत्या. मात्र शेवटचा गडी बाद झाला नाही. दोन्ही फलंदाजांनी नाबाद भागीदारी करत लक्ष्य गाठले. पाकिस्तानी संघाच्या हृदयाचा चुराडा केला. श्रीलंकेने तिसऱ्यांदा आशिया कप रायझिंग स्टार्सचे विजेतेपद पटकावले.

198/9 अशा नाजूक स्थितीतून लाहिरू समरकून (11 धावा, 21 चेंडू, 2 चौकार) आणि गरुका संकेत (4 धावा, 7 चेंडू) यांनी संयम आणि शांतता दाखवत शेवटची विकेट टिकवून धरली. दोघांनी मिळून 19 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत श्रीलंका ‘अ’ संघाला 41.2 षटकांत 217/9 पर्यंत पोहोचवले आणि एक संस्मरणीय विजय मिळवून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या निशन मदुष्काने एक बाजू सांभाळत 95 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 87 धावांची शानदार खेळी केली.

Loading...

त्याच्या व्यतिरिक्त कर्णधार पवन रत्नायकेने 30, लसिथ कृस्पुलने 26 (31 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार), सिनेथ जयवर्धनेने 20 (13 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार), विजयकांत वियास्कंथने 13 आणि जनिथ लियानागेने 11 धावा केल्या, तर 140/2 ते 140/4 आणि नंतर 198/6 ते 198/9 दरम्यान सतत विकेट पडत राहिल्याने सामना शेवटच्या श्वासापर्यंत रोमांचक राहिला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तान ‘अ’ संघाला 50 षटकांत 9 गडी गमावून केवळ 216 धावाच करता आल्या. साहिबजादा खानच्या 60, रोहेल नझीरच्या 37, शामल हुसेनच्या 40 आणि कर्णधार अब्दुल समदच्या 33 धावा करूनही पाकिस्तानी संघाची मधली आणि खालची फळी अपयशी ठरली. रोहेल नझीरने 37 धावांची वेगवान खेळी केली नसती, तर पाकिस्तानला 200 धावांचा टप्पा ओलांडणेही शक्य झाले नसते. रविंदू फर्नांडो आणि गरुका यांनी श्रीलंकेकडून प्रत्येकी 3 बळी घेतले. श्रीलंका ‘अ’ संघाच्या गोलंदाजांना आणि नंतर शेवटच्या जोडीला फायदा घेण्याची संधी मिळाली आणि त्यांनी विजेतेपद पटकावले.

आशिया कप रायझिंग स्टार्स क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत ‘अ’ संघावर आठ गडी राखून सहज विजय मिळवत श्रीलंका ‘अ’ संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. सलामीवीर लसिथ कृषपुळे आणि सिनेथ जयवर्धने यांच्या शतकांच्या आणि दोघांमधील मोठ्या शतकी भागीदारीच्या जोरावर हा विजय शक्य झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us