M S Dhoni : धोनीमुळं मला खूपच दु:ख झालं, त्या बड्या प्लेअरनं खदखद बाहेर काढली, मनातलं सगळं बोलून दाखवलं!
सोबतच धोनी हा अतिशय शांत स्वभाव असणारा माणूस आहे. धोनी कधीच भूतकाळात रमत नाही. तो सध्या माझ्यापुढे काय आहे आणि भविष्यात काय करू शकतो, याचाच विचार करतो. एकदा गेलेला क्षण धोनीसाठी संपलेला असतो, असं कुलसेकराने आवर्जुन सांगितलं.

M S Dhoni : एम एस धोनी म्हटलं की संपूर्ण भारताला आठवतो तो 2011 सालचा विश्वचषक. या विश्वचषकात धोनीने शानदार षटकार मारून भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. त्यावेळी भारत 2011 सालचा विश्वचषक विजेता ठरला. महेंद्रसिंह धोनीने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. परंतु त्याचं क्रिकेटमधील प्रस्थ अजूनही संपलेलं नाही. 2011 सालच्या विश्वचषकात धोनीने श्रीलंकेच्या नुवान कुलसेकरा याला षटकार मारला होता. आता त्याच कुलसेकरा याने धोनीच्या काही खास सवयींबाबत सांगितलं आहे. धोनीने जेव्हा षटकार लगावला होता, तेव्हा कुलसेकरा याला प्रचंड दु:ख झाले होते.
जेव्हा धोनीने मला षटकार लगावला तेव्हा…
धोनीने षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. भारताने 48.2 षटकांत 275 धावांचे टार्गेट पूर्ण केले होते. याच षटकाराबाबत कुलसेकरा याने आठवणी सांगितल्या आहेत. जेव्हा धोनीने मला षटकार लगावला तेव्हा मला खूप दु:ख झाले, असं त्याने सांगितलं. सोबतच महेंद्रसिंह धोनी हा माणूस म्हणून खूपच चांगला आहे, असंही सांगायला तो विसरला नाही. कुलसेकरा कधीकाळी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा भाग होता. त्याने 2011 साली चेन्नईकडून एक तर 2012 साली पाच सामने खेळले होते. या काळातही त्याने धोनीसोबतच्या अनुभवांवर भाष्य केलंय.
विश्वचषकातील विजयावर धोनीने कधीही…
कुलसेकराने रेवस्पोर्ट्जसोबत बोलताना विश्वचषक संपल्यानंतर मी लगेच आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघात सामील झाले. परंतु या काळात धोनीने विश्वचषकातील विजयावर धोनीने कधीही भाष्य केलं नाही. सोबतच धोनीने मला मारलेल्या षटकारावरही कधीच भाष्य केलं नाही, असं कुलेकरा याने आवर्जुन सांगितले.
एकदा गेलेला क्षण धोनीसाठी संपलेला असतो
सोबतच धोनी हा अतिशय शांत स्वभाव असणारा माणूस आहे. धोनी कधीच भूतकाळात रमत नाही. तो सध्या माझ्यापुढे काय आहे आणि भविष्यात काय करू शकतो, याचाच विचार करतो. एकदा गेलेला क्षण धोनीसाठी संपलेला असतो. तो नेहमी वर्तमानावर लक्ष केंद्रीत करतो. मी धोनीच्या या स्वभावाची नेहमीच प्रशंसा करत आलो आहे, असही कुलसेकराने आवर्जून सांगितलं.
