ICC Women’s World Cup: श्रीलंकन फलंदाजाने ठोकलं वेगवान अर्धशतक, मोठा विक्रम मोडला

आयसीसी वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या 15व्या सामन्यात श्रीलंका आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात श्रीलंकेने 50 षटकात 6 गडी गमवून 258 धावा केल्या. या सामन्यात निलाक्षी डिसिल्वाने आक्रमक खेळी केली.

ICC Women’s World Cup: श्रीलंकन फलंदाजाने ठोकलं वेगवान अर्धशतक, मोठा विक्रम मोडला
ICC Women’s World Cup: श्रीलंकन फलंदाजाने ठोकलं वेगवान अर्धशतक, मोठा विक्रम मोडला
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 14, 2025 | 8:23 PM

आयसीसी वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेतील प्रत्येक सामना आता महत्त्वाचा असणार आहे. कारण उपांत्य फेरीची लढत आता चुरशीची होणार आहे. स्पर्धेच्या 15व्या सामन्यात श्रीलंका आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात श्रीलंकन कर्णधार चामरी अटापट्टू आणि विशमी गुणरत्ने यांनी चांगली सुरुवात करून दिली. विशमी गुणरत्नने 42 धावा आणि चामरी अटापट्टूने 53 धावांची खेळी केली. त्यानंतर हसिनी परेराने 44 धावांचं योगदान दिलं. श्रीलंकेने 41वं षटक सुरु असताना तिसऱ्या चेंडूव चौथी विकेट गमावली. तेव्हा संघाच्या 188 धावा होत्या. तेव्हा फलंदाजीसाठी निलाक्षी डिसिल्वा आली. त्यानंतर लगेचच हसिनीच्या रुपाने पाचवी विकेट पडली. त्यानंतर निलाक्षी हाती मोर्चा सांभाळला आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली.

निलाक्षीने आक्रमक खेळी करत फक्त 28 चेंडूत 196.42 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 55 धावांची खेळी केली. या डावात तिने 7 चौकार आणि 1 षटकार मारला. तिच्या या खेळीमुळे श्रीलंकेने 50 षटकात 6 गडी गमवून 258 धावांची खेळी केली. निलाक्षीने फक्त 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. महिला वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेतील हे सर्वात वेगवान शतक आहे. तिच्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूने 30 चेंडूंपेक्षा कमी वेळेत अर्धशतक झळकावलेले नाही. बांगलादेशच्या सोरनाने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध आक्रमक अर्धशतक ठोकलं. पण यासाठी तिने 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होतं.

दुसरीकडे, निलाक्षी डिसिल्वाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. निलाक्षीने वनडे क्रिकेट कारकि‍र्दीत 1000 धावांचा पल्ला गाठला आहे. तिने 51 सामन्यात ही कामगिरी केली. निलाक्षी श्रीलंकेसाठी 103 टी20 सामने खेळली आहे. यात तिने 1151 धावा केल्या आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे या सामन्यात षटकं कमी करण्याची वेळ आली. आता पाऊस थांबतो का? आणि न्यूझीलंडसमोर किती षटकात किती धावांचं आव्हान मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सामन्यातील निकालानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर होणार आहे.