IND vs SL: भारताने दिला पराभवाचा शॉक, आता श्रीलंकन क्रिकेटमध्ये होणार मोठी उलथापालथ

वनडे सीरीजमध्ये, तर टीम इंडियाने श्रीलंकेला डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. मैदानावर श्रीलंकन टीमची खराब कामगिरी असताना, मैदानाबाहेरही श्रीलंकन क्रिकेटसाठी सर्वकाही आलबेल नाहीय.

IND vs SL: भारताने दिला पराभवाचा शॉक, आता श्रीलंकन क्रिकेटमध्ये होणार मोठी उलथापालथ
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 1:34 PM

कोलंबो: श्रीलंकन क्रिकेट टीमसाठी भारत दौरा निराशाजनक ठरला. आधी T20 सीरीजमध्ये 2-1 त्यानंतर वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेला 3-0 अशी धूळ चारली. वनडे सीरीजमध्ये, तर टीम इंडियाने श्रीलंकेला डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. मैदानावर श्रीलंकन टीमची खराब कामगिरी असताना, मैदानाबाहेरही श्रीलंकन क्रिकेटसाठी सर्वकाही आलबेल नाहीय. श्रीलंकन क्रिकेटमध्ये एक प्रकारची अस्वस्थतता आहे. तिथलं सरकार श्रीलंकन क्रिकेट बोर्ड या आठवड्यात बर्खास्त करु शकतं.

का बर्खास्त होऊ शकतं श्रीलंकन क्रिकेट बोर्ड?

पुढच्या काही आठवड्यात श्रीलंकन क्रिकेटच प्रशासन बर्खास्त होऊ शकतं. मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप झाला. त्या संदर्भातील काही घटनांची सहा सदस्यीय समितीने चौकशी केली. श्रीलंकन क्रिकेटवर होणारा खर्च आणि सामना पाहण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवण्याबद्दल समितीच्या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळेच सरकार श्रीलंकन क्रिकेट बोर्ड बर्खास्त करु शकतं. आर्थिक गैरव्यवहारांमुळे कमिटीने श्रीलंकन क्रीडा मंत्र्यांना क्रीडा कायद्यातंर्गत आपले अधिकार वापरण्याचा सल्ला दिलाय

खर्चाच ऑडिट करण्याचा सल्ला

तपासकर्त्यांनी क्रीडा मंत्र्यांना खर्चाच ऑडिट करण्याच आणि पुरावे नष्ट करु नयेत, यासाठी कागदपत्र जप्त करण्याचे आदेश दिलेत. रिपोर्ट्चा आढावा घेतल्यानंतर योग्य ती कारवाई करु असं श्रीलंकन क्रीडा मंत्र्यांनी सांगितलं. सरकारने बोर्ड बर्खास्त केल्यास कायदेशीर उत्तर देण्याचा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचा विचार आहे. बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीलंकन क्रिकेटचा फंड व्यक्तीगत फायद्यासाठी वापरल्याचा आरोप आहे. पैसा उधळणं श्रीलंकेला नाही परवडणार

श्रीलंकन सरकारने श्रीलंकन क्रिकेट बोर्ड बर्खास्त केल्यास तिथल्या क्रिकेटमध्ये बरीच उलथा-पालथ होऊ शकते. आधीच श्रीलंका आर्थिक समस्याचा सामना करत आहे. मागच्यावर्षी श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडली होती. तिथे खाण्या-पिण्याच्या वस्तुंपासून अबाळ झाली होती. इंधनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकन क्रिकेट बोर्ड अशा प्रकारे पैसा उधळत असेल, तर त्यांना ते परवडणार नाही.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.