स्टुअर्ट ब्रॉडने सामन्यापूर्वी विराट कोहलीची उडवली खिल्ली, चाहते भडकताच थेट…

भारताचा स्टार फलंदाज यंदाच्या टी२० विश्वचषकात काही खास कामगिरी करु शकलेला नाही. त्याच्याकडून आज चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पण सामन्याच्या आधी इंग्लंडचा माजी खेळाडू स्टुअर्ट ब्रॉडने विराट कोहलीची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. पण चाहते संतापताच त्याने थेट कमेंट डिलीट करुन टाकली.

स्टुअर्ट ब्रॉडने सामन्यापूर्वी विराट कोहलीची उडवली खिल्ली, चाहते भडकताच थेट...
virat kohli
| Updated on: Jun 29, 2024 | 6:16 PM

India vs south africa T20 final : T20 विश्वचषकाचा फायनल सामना आज रंगणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( Ind vs SA ) यांच्यात हा सामना रंगणार आहे. टीम इंडियाच्या विजयासोबतच भारतीय चाहते स्टार फलंदाज विराट कोहलीच्या ( Virat Kohli ) फॉर्ममध्ये परतण्याची वाट पाहत आहेत. त्याआधी इंग्लंडचा माजी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने विराट कोहलीची खिल्ली उडवली आहे. मात्र, यानंतर भारतीय चाहत्यांकडून त्याच्यावर जोरदार टीका होऊ लागल्याने त्याने नंतर ती कमेंट डिलीट करुन टाकली.

विराट कोहली या स्पर्धेत फॉर्मात नाही

विराट कोहली या स्पर्धेत फॉर्मात नाहीये. या स्पर्धेत त्याला सलामीला खेळवले गेले आहे. पण त्याच्याकडून हवी तशी कामगिरी झालेली नाही. सात सामन्यांत कोहलीच्या बॅटमधून फक्त 75 धावा आल्या आहेत. त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याला केवळ काही सामन्यांमध्ये दुहेरी आकडा गाठता आला आहे. तर दोन वेळा तो शुन्यावर आऊट झालाय.

ICC ने विराट कोहलीचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो राजाच्या खुर्चीवर बसलेला दिसत आहे. कोहलीचे मागील विश्वचषकातील अनेक फोटो त्यासोबत शेअर करण्यात आले आहेत. आयसीसीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘राजाच्या मुकुटात एक हिरा शिल्लक आहे. कोहली टी-20 विश्वचषक जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे.’ विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली आहे, परंतु त्याला अद्याप टी-20 विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे आयसीसीने ही पोस्ट केली आहे.

चाहत्यांनी ब्रॉडला केले ट्रोल

इंग्लंडचा माजी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने या पोस्टवर कमेंट केली आहे. कमेंट करताना त्याने लिहिले, ‘आयपीएल?’ स्टुअर्ट ब्रॉडने या कमेंटसह विराट कोहलीच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले. कारण कोहली आतापर्यंत आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. ब्रॉडची ही कमेंट भारतीय चाहत्यांना आवडली नाही. कमेंट करून त्याने ब्रॉडला ट्रोल केले. चाहत्यांनी ब्रॉडला 2007 च्या T20 वर्ल्ड कपची आठवण करून दिली जेव्हा युवराज सिंगने त्याच्या ओव्हरमध्ये सहा सिक्स ठोकले होते. त्यानंतर ब्रॉडने कमेंट डिलीच केली. पण तोपर्यंत स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते.