AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021 मध्ये दोन गोष्टी घातक ठरल्या, सुनील गावसकरांनी सांगितली टीम इंडियाच्या फ्लॉप शोची कारणं

2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा खेळ संपला आहे. संघाला सुपर 12 स्टेजवरुनच आता बॅग पॅक करुन परतावं लागणार आहे. भारतीय खेळाडूंची खराब कामगिरी यामागचं प्रमुख कारण ठरली.

T20 World Cup 2021 मध्ये दोन गोष्टी घातक ठरल्या, सुनील गावसकरांनी सांगितली टीम इंडियाच्या फ्लॉप शोची कारणं
Sunil Gavaskar
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 12:50 PM
Share

मुंबई : 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा खेळ संपला आहे. संघाला सुपर 12 स्टेजवरुनच आता बॅग पॅक करुन परतावं लागणार आहे. भारतीय खेळाडूंची खराब कामगिरी यामागचं प्रमुख कारण ठरली. पण एवढी खराब कामगिरी का झाली, हा प्रश्नदेखील आहेच. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असतानाही टीम इंडियाने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यापूर्वी गुडघे का टेकले. दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारताच्या पराभवामागची किंवा खराब कामगिरीची दोन कारणं सांगितली आहे. स्पोर्ट्स तकशी बोलताना त्यांनी या दोन्ही गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. (Sunil Gavaskar marks 2 reasons behind team India’s flop show in T20 World Cup 2021)

सुनील गावसकर यांनी दोन जीवघेण्या गोष्टी टीम इंडियाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची दोन मोठी कारणे म्हणून पाहिल्या. या दोन गोष्टी विराट अँड कंपनीच्या फ्लॉप शोचे कारण असल्याचे गावसकर यांनी सांगितले. गावसकर यांनी ज्या दोन गोष्टी निदर्शनास आणून दिल्या त्या त्यांच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाशी संबंधित आहेत.

पॉवरप्लेचा योग्य वापर केला नाही

भारताचे माजी कर्णधार आणि सलामीवीर सुनील गावसकर यांच्या मते, टीम इंडियाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचे पहिले प्रमुख कारण म्हणजे फलंदाजांनी पॉवरप्लेचा चांगला उपयोग न करणे. ही समस्या केवळ या स्पर्धेचीच नाही तर याआधी खेळलेल्या आयसीसी स्पर्धेतही अशी परिस्थिती होती. गावसकर म्हणाले, “ज्या प्रकारची फलंदाजी पहिल्या 6 षटकांमध्ये व्हायला हवी होती, ती दिसली नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही, ज्याचा फटका संघाला सहन करावा लागला. पहिल्या 6 षटकांमध्ये फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. मात्र याचा फायदा भारताने घेतला नाही. गेल्या अनेक स्पर्धांमध्ये भारताला याचा फायदा घेता आलेला नाही. तगड्या प्रतिस्पर्ध्यासमोर भारतीय संघ मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला आहे.

ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे सामने निसटले

गावसकर यांनी भारताच्या फ्लॉप शोचे दुसरे कारण क्षेत्ररक्षण असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, “तुम्ही न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षण पाहा, ते ज्या पद्धतीने चेंडू स्विंग करतात, धावा वाचवतात, झेल घेतात, ते केवळ आश्चर्यकारक आहे. आक्रमणात जीव नसला तरी आणि खेळपट्टी सपाट असली तरी उत्तम क्षेत्ररक्षणामुळे सामन्यात फरक पडू शकतो. पण जर तुम्ही भारतीय संघ पाहिला तर 3-4 खेळाडू वगळता इतर खेळाडूंकडून धावा वाचवण्याची किंवा मैदानावर डाईव्ह मारण्याची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही.”

इतर बातम्या

…तर भारतीय संघ T20 World Cup मध्ये चांगली कामगिरी करु शकला असता; प्रशिक्षकांनी सांगितली पराभवामागची कारणं

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

T20 World Cup India vs Namibia live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारताचा विश्वचषकातील शेवटचा सामना

(Sunil Gavaskar marks 2 reasons behind team India’s flop show in T20 World Cup 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.