AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर भारतीय संघ T20 World Cup मध्ये चांगली कामगिरी करु शकला असता; प्रशिक्षकांनी सांगितली पराभवामागची कारणं

ICC T20 विश्वचषक 2021 मधील शेवटचा साखळी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असलेल्या भारतीय संघाला ग्रुप स्टेजमधूनच बाद व्हावे लागले आहे.

...तर भारतीय संघ T20 World Cup मध्ये चांगली कामगिरी करु शकला असता; प्रशिक्षकांनी सांगितली पराभवामागची कारणं
team India
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 12:12 PM
Share

मुंबई : ICC T20 विश्वचषक 2021 मधील शेवटचा साखळी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असलेल्या भारतीय संघाला ग्रुप स्टेजमधूनच बाद व्हावे लागले आहे. गेल्या 9 वर्षात पहिल्यांदाच भारतीय संघ कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. (Bharat Arun says, a small break between IPL 2021 and T20 World Cup would be helpful fro Team India)

भारतीय संघ पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी चांगली करु शकला नाही, त्यामुळे दोन्ही संघांविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला आणि भारतीय संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर गेला. भारतीय संघाच्या या वाईट कामगिरीमागे वेगवेगळी कारणे आहेत आणि त्यातील एक कारण म्हणजे बायो-बबल आणि सातत्याने खेळत असल्यामुळे आलेला थकवा. संघाचा वरिष्ठ गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या या वक्तव्यानंतर संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनीही त्याची पाठराखण केली आहे. आयपीएल 2021 आणि विश्वचषक दरम्यान भारतीय खेळाडूंना थोडी विश्रांती मिळाली असती तर कदाचित संघाची कामगिरी चांगली झाली नसती, असेही बुमराहने म्हटले आहे.

17 ऑक्टोबरपासून ओमान आणि UAE मध्ये सुरू झालेल्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय खेळाडू IPL 2021 च्या उत्तरार्धात जवळजवळ एक महिना व्यस्त होते. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन यूएईतच करण्यात आले होते. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल या खेळाडूंनी या काळात आपापल्या संघासाठी जवळपास सर्व सामने खेळले. आयपीएल सुरू होण्याच्या एक आठवड्यापूर्वी, कोहली, रोहित, राहुल, बुमराह आणि शमी सारखे भारतीय खेळाडू जवळजवळ 3 महिने इंग्लंडमध्ये होते जिथे त्यांनी 5 कसोटी सामने खेळले. यादरम्यान भारतीय खेळाडू अनेक दिवस बायो-बबलमध्ये राहिले. म्हणजेच भारतीय खेळाडू सतत व्यस्त होते.

IPL आणि T20 World Cup दरम्यान ब्रेक मिळाला फायदा झाला असता

टीम इंडियासोबत अखेरच्या काही दिवसांचा वेळ घालवत असलेले गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी नामिबियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “वरवर पाहता संघाच्या खराब कामगिरीच्या अनेक कारणांपैकी एक कारण संघाला विश्रांतीची संधी न मिळणे हे देखील होते.”

अरुण म्हणाले की, “6 महिने घरापासून दूर राहणे ही मोठी गोष्ट आहे. मला वाटते की गेल्या आयपीएलच्या निलंबनानंतर त्यांना छोटा ब्रेक मिळाला होता, तेव्हापासून खेळाडू घरी गेलेले नाहीत. ते 6 महिन्यांपासून बायो-बबलमध्ये आहेत आणि याचा शरीरावर खूप परिणाम होतो. आयपीएल आणि विश्वचषक यांच्यातील एक छोटा ब्रेक खेळाडूंसाठी फायदेशीर ठरू शकला असता.”

इतर बातम्या

पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

T20 World Cup India vs Namibia live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारताचा विश्वचषकातील शेवटचा सामना

(Bharat Arun says, a small break between IPL 2021 and T20 World Cup would be helpful fro Team India)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.